अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: शिवसेना शिंदे गटाचा आमदार आणि मंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत कालच्या अजित पवार सरकार सहभागी होण्यावर आणि शिंदे गटाच्या मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. कालच्या विस्तारानंतर शिवसेनेत हालचालींना वेग आला. शिवसेनेचे सर्व मंत्री आमदार ठाण्यात आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त आल्याचे सर्वजण सांगत होते, मात्र कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. यादरम्यान येत्या 8 दिवसांत आणखी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून ज्यांची नाव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठरवली आहेत त्यांचा शपथविधी होईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
गुरुपौर्णिमेबद्दल...
आयुष्यात राजकारणात सुरुवात केली ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ही जडणघडण बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे त्यांच्यामुळे, त्यामुळे खरा नमन करण्याचा आजचा दिवस आहे. धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणार आहे. बाळासाहेबांचे उपकार कधीच विसरणार नाही. ठाकरे गटाला शिवसेनाप्रमुख कळालेच नाही .शिवसेना प्रमुख एका कुटुंबाचे नाही महाराष्ट्र नव्हे तर ते देशाचे दैवत आहे. बाप चोरला हे संकुचित विचारे असे विचार नसावे अनेक महापुरुष आहेत त्यांच्या बाबत कोण बोलत नाही मात्र यांची मनोवृत्ती वाईट आहे शिवसेना प्रमुख यांचा यांना विसर पडलेला आहे.
अजित पवारांबद्दल...
कार्यकर्ता स्वाभिमान कधी विकत नाही. त्यामुळे मी पहिल्यापासून सांगत होतो अजित दादा अस्वस्थ आहे ते कुठे ना कुठे जातील आणि तो काल त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचे आम्ही स्वागत करतो. राजकारणाच्या वेळेस राजकारण करा मात्र महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे जो कोणी बरोबर येईल त्यांना आम्ही घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे.
संजय राऊतांबद्दल...
त्यांची चूल विझली आहे हे नक्की झालं आहे .त्यांची चूल विझली आहे ना मग आम्ही नवीन चुलीवरती करू, या गॅस वरती करू आमची भाकरी करपणार नाही आमची भाकरी भाजल्या जातील आणि चांगल्या प्रकारे लोकांना खायला दिल्या जातील.
सरकारबद्दल...
यामध्ये इंजिन कोणी समजायचा, डबा कोणी समजायचं हा वादाचा विषय आता राहणार नाही पण सरकार बुलेट ट्रेनच्या स्पीडने चालेल एवढे निश्चित आहे.
जितेंद्र आव्हाडांबद्दल...
कोण कोणाकडे राहील ते जितेंद्र आव्हाडांना माहित असेल, जितेंद्र आव्हाड थांबले हे नशीब! नाहीतर ते ही इकडे आले असते, असे शिरसाट म्हणाले.