शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
4
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
5
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
6
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
7
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
8
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
9
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
10
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
11
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
12
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
13
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
14
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
15
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
16
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
17
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
19
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
20
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू

ज्येष्ठांसाठी मदतीची ‘काठी’; महामंडळ झाले स्थापन; दीड कोटी वृद्धांना सरकार देणार सहाय्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 9:10 AM

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल.

मुंबई - राज्यातील साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना गुरुवारी करण्यात आली.  १ कोटी ५० लाख ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण, छळ, पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण आणि त्यांना निवारा पुरविणे आणि विमा कवच देणे ही महामंडळाची उद्दिष्टे असतील. 

राज्य मंत्रिमंडळाच्या २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत या महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने आता काढला आहे. महामंडळाचे मुख्यालय मुंबईत असेल. विद्यमान वा निवृत्त सनदी अधिकारी हे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीच्या सर्व योजना एका छताखाली आणून त्यांचा लाभ मिळवून देण्याचे काम हे महामंडळ करेल. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना राबविताना निधीची अडचण येऊ नये यासाठी स्वतंत्र निधी उभारण्यात येईल. सुरुवातीला महामंडळाचे भागभांडवल हे ५० कोटी रुपये असेल. वृद्धाश्रमांच्या संदर्भात एकात्मिक धोरण हे महामंडळ तयार करेल. 

...अशा आहेत कल्याणकारी योजना

महायुती सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय आधीच घेतले आहेत. बीपीएलमधील ज्येष्ठ नागरिकांना तीन योजनांमध्ये पूर्वी मासिक ६०० रुपये दिले जात असत. आता १५०० रुपये मासिक दिले जातात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ६० वर्षे वयावरील सर्व नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमाकवच दिले आहे. या योजनेच्या राज्य व जिल्हा संनियंत्रण समितीवर ज्येष्ठ नागरिकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेल्पलाइन येणार 

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी हेल्पलाइन तयार केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना ताणतणावाचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाईल. त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था व बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या समस्यांसंबंधी अभ्यास केला जाईल. त्याआधारे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या योजना व उपक्रम राबविले जातील. 

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिक