शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

देशातील पहिली जीन बँक राज्यात; १७२ कोटींचा खर्च; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 8:17 AM

जैवविविधतेचे संवर्धन होणार, या निर्णयाने राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे.

मुंबई : सागरी जैवविविधता, पिकांचे वाण, पशुधनाच्या विविध जाती, गवत, माळरान आणि कुरणांमधील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनुक कोष (जीन बँक) तयार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. असा कोष निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.

या निर्णयाने राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. वनहक्क क्षेत्रासाठी संरक्षण व व्यवस्थापन योजना, वनपरिसर पुनर्निर्माण या घटकांचाही सदर कोषात समावेश असेल. जैवविविधतेतील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठीचा हा प्रकल्प असेल. त्यासाठी येत्या पाच वर्षांत १७२.३९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पोलीस अधिकारी, अंमलदारांना घरबांधणी कर्जराज्यातील पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणेच शासकीय घरबांधणी अग्रिम योजनेतून अग्रिम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. सध्या खाजगी बँकामार्फत असलेल्या या कर्ज योजनेमध्ये व्याजाच्या तफावतीची रक्कम जास्त असल्याने शासनावर आर्थिक भार पडत आहे. तसेच या बँकांकडून कर्जव्यवस्था होत नसल्यामुळे सदर योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यापूर्वीच कर्जवाटप करण्यात आलेल्या ५०१७ अर्जांच्या अनुषंगाने किमान त्यांचा कर्ज परतावा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या कर्जाच्या व्याजावरील फरकाची शासनाकडून देय असणारी रकमेची तरतूद करण्यासही मान्यता देण्यात आली. 

रेडिएशन ऑन्कोलॉजी युनिटठाणे, रत्नागिरी, बारामती, जालना या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय बैठकीत झाला. विमा कंपन्यांशी झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीस उपलब्ध झालेल्या २७२.७१ कोटी निधीतून या सुविधा उभारण्यात येतील.चारही जिल्ह्यांमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी युनिट स्थापन करण्यात येतील. त्याचप्रमाणे जिथे वैद्यकीय महाविद्यालये नाहीत अशा १९ जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब, सीव्हीटीएस ऑपरेशन थिएटर, लॅमिनार ऑपरेशन थिएटर, ईएसडब्ल्यूएल मशीन व २५ ते ३० डायलिसिस मशिन्स बसविण्यात येतील.