१२ आमदारांचा निर्णयही दिला नाही, आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:03 PM2022-07-04T14:03:53+5:302022-07-04T14:03:53+5:30

अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही उल्लेख केला.

The decision of 12 MLAs was not given the Governor suddenly came into action mode Ajit Pawar maharashtra vidhan sabha politics | १२ आमदारांचा निर्णयही दिला नाही, आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले : अजित पवार

१२ आमदारांचा निर्णयही दिला नाही, आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले : अजित पवार

Next

विधानसभेत भाजप आणि शिंदे यांच्या गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला १६४ मतं मिळाली. तर दुरीकडे महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली. यानंतर अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर भाषणामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही उल्लेख केला.

“एक गोष्टी खरी आहे. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. सदस्यांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ठराव इतक्या घाईत तसा आणण्याची गरज नव्हती, असं तज्ज्ञ म्हणतात. परंतु अनेक गोष्टी लांबणीवर टाकण्याचं काम लांबणीवर टाकण्याचं काम राज्यपालांनी केलंय. आम्ही सरकारमध्ये असताना आपण एकत्र राज्यपालांना कितीदा भेटायला गेलोय. १२ आमदारांचा निर्णयही राज्यपालांनी दिला नाही. आता तर राज्यपाल अॅक्शन मोडमध्ये आलेत. वास्तविक ते महामहिम आहे. १२ आमदारांची नावांना त्यांनी मान्यता दिली नाही,” असं अजित पवार म्हणाले.

“पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर सव्वा वर्ष आम्ही सातत्यानं अधिवेशनांत तारीख मागितली. कॅबिनेटला ठराव करायचो, पण अध्यक्षांची निवड अखेपर्यंत लागली नाही. आता मात्र ताबडतोब निवड झाली. मागच्या चार दिवसांमध्ये घटना इतक्या जलद झाल्या,” असंही त्यांनी नमूद केलं.

मविआचं शतक हुकलं
भाजपाच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडलेला विश्वास प्रस्ताव जिंकला आहे. शिंदें गट आणि भाजपाच्या सरकारच्या बाजूने विधानसभेतील १६४ आमदारांनी पाठिंबा देत मतदान केले. तर महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ आज अजून घटल्याचे दिसून आले, महाविकास आघाडीच्या बाजूने विश्वासमत प्रस्तावाविरोधात केवळ ९९ आमदारांनी मतदान केलं. तर सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.

Web Title: The decision of 12 MLAs was not given the Governor suddenly came into action mode Ajit Pawar maharashtra vidhan sabha politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.