पुणे - स्त्री शिक्षणासाठी सर्वप्रथम पाऊल उचलले ते थोरले प्रतापसिंह महाराज यांनी. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं. एका दृष्टिकोनातून पाहिलं तर महात्मा जाेतिबा फुले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले व्हिजनरी होते. आयुष्यभर कष्ट करून संपत्ती गोळा केली ती समाजसुधारणेसाठी वापरली, असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या पुण्यतिथी आहे. महापुरुषांबाबतीत जर कोणी अपमानास्पद बोलत असेल तर यासाठी कायदा केला जावा, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
वाघ्याची समाधी हटवारायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर उदयनराजे आक्रमक झाले.ही समाधी तत्काळ हटविण्याची मागणी त्यांनी केली. पैसे हे महाराजांच्या समाधीसाठी दिले होते, असेही त्यांनी सांगितले.