राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाला ३, भाजपा अन् अजित पवार गटाला किती? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 09:42 AM2023-07-27T09:42:12+5:302023-07-27T09:43:30+5:30

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेली १२ आमदारांची यादी अडविली होती. यावरून राजकारण सुरु होते.

The formula for governor-appointed MLCs came vidhan parishad; 3 for Eknath Shinde group, how many for BJP and Ajit pawar group? | राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाला ३, भाजपा अन् अजित पवार गटाला किती? 

राज्यपाल नियुक्त आमदारांचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाला ३, भाजपा अन् अजित पवार गटाला किती? 

googlenewsNext

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळापासून रेंगाळलेला १२ राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांचा विषय आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी आमदारांचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदे गटाने म्हटल्याप्रमाणे आता भाकरीत वाटेकरी निर्माण झाले आहेत. परंतू, ते भाजपाच्या नाही तर शिंदे गटाच्याच वाट्याला आले आहेत, असे या फॉर्म्युल्यावरून दिसत आहे. 

पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेली १२ आमदारांची यादी अडविली होती. यावरून राजकारण सुरु होते. या यादीतील एकनाथ खडसे हे विधानपरिषद निवडणुकीत निवडूनही आले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने पुढे सत्तांतर झाले आणि ही यादीच मागे पडली होती. 

आता शिंदे आणि भाजपाच्या सरकारमध्ये तिसरा पक्ष आला आहे. यामुळे या १२ जागा आता तीन पक्षांत विभागल्या जाणार आहेत. यापैकी भाजपाला ६, शिवसेनेला ३ व अजित पवार गटाला ३ जागा दिल्या जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. एबीपी माझाने याचे वृत्त दिले आहे. आता या यादीत कोणाकोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  
 

Web Title: The formula for governor-appointed MLCs came vidhan parishad; 3 for Eknath Shinde group, how many for BJP and Ajit pawar group?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.