महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 04:15 PM2023-04-11T16:15:05+5:302023-04-11T16:16:13+5:30

उद्या ही मानसिकता सोडून काहीतरी वेगळं करायचा असा कुणी निर्णय घेतला तर हा त्यांचा निर्णय असेल असंही शरद पवार म्हणाले.

The future of Mahavikas Aghadi cannot be said today; Why did Sharad Pawar say that? | महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही; शरद पवार असं का म्हणाले?

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचं काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुका आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवल्या. मात्र महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. 

कुणाशीही चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे...; शरद पवारांचे मोठं विधान

शरद पवार म्हणाले की, मविआच्या भविष्याबाबत आज सांगता येणार नाही. कोण कशी भूमिका घेईल हे आज सांगता येणार नाही. हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यातील सहकारी आणि नेतृत्वाची आता मानसिकता एकत्रित काम करण्याची आहे. जोपर्यंत ही मानसिकता आहे तोपर्यंत मला काळजी नाही. उद्या ही मानसिकता सोडून काहीतरी वेगळं करायचा असा कुणी निर्णय घेतला तर हा त्यांचा निर्णय असेल. तिन्ही पक्षांचा असणार नाही असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. 

चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला
मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करून तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यावर भाष्य केले.  

वैयक्तिक टीका टाळा
राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरून भाजपा-ठाकरे गटात रणकंदन माजलं होते. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे. वैयक्तिक हल्ला टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले. 

Web Title: The future of Mahavikas Aghadi cannot be said today; Why did Sharad Pawar say that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.