मुंबई : राज्याच्या विकसित आणि मागास भागांमधील दरडोई उत्पन्नाचा तुलनात्मक विचार केला तर दोघांमधील अंतर मोठे असल्याचे निदर्शनास येते. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात ही बाब ठळकपणे समोर आली आहे.
विभागवार काय स्थिती?विभागांचा विचार केला तर पहिला क्रमांक कोकण विभागाचा लागतो. अर्थात मुंबई ठाण्यामुळे ही आकडेवारी वाढलेली दिसते. त्या खालोखाल पुणे विभागाचा आणि नंतर नागपूर विभागाचा क्रम लागतो. सर्वात तळाशी आहे तो अमरावती विभाग. मराठावाडा खालून दुसरा आहे.
जिल्ह्यांचा विचार करता नंदूरबार आणि गडचिरोली हे दोन जिल्हे तळाशी आहेत. १ लाख २५ हजार रुपयांपेक्षा दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदूरबार गडचिरोली बुलडाणा वाशिम यांचा समावेश आहे.
२०२१-२२ मध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न किती ? (आकडे रुपयांत)मुंबई ३ लाख ४४ हजार ३९४ ठाणे २ लाख ९४ हजार ३६२पुणे २ लाख ८५ हजार ४०९नागपूर २ लाख ४६ हजार ७५०रायगड २ लाख ४१ हजार ४४४
राज्यात तब्बल ४.३३ लाख वाहने; मोटर सायकलींचा वाटा ३.१५ कोटींचासाडेतेरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात तब्बल ४ कोटी ३२ लाख ९८५४० वाहने आहेत. त्यातील मोटरसायकली आहेत ३ कोटी १५ लाख ८९ हजार ८९८.
१७ रुग्णवाहिका राज्यात दर एक लाख लोकसंख्येमागे आपल्या राज्यात केवळ १७ रुग्णवाहिका असल्याचे कटुसत्यही आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आले आहे.विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल
- उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्रच देशात अव्वलस्थानी आहे. विशेष म्हणजे, ज्या गुजरातवरून महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत बरेचदा राजकारण होते तो गुजरात परकीय गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राच्या आसपासही नाही.
- केवळ २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांमधील परकीय गुंतवणुकीचा विचार केला तर देशात आजवर आलेल्या अशा गुंतवणुकीत महाराष्ट्राचा एकट्याचा वाटा तब्बल २८.५ टक्के आहे आणि गुंतवणुकीचा आकडा आहे १० लाख ८८ हजार ५०२ कोटी रुपये इतका.
- महाराष्ट्रात २०२१-२२ मध्ये १ लाख १४ हजार ९६४ कोटी रुपये इतकी तर २०२२-२३ मध्ये ६२ हजार ४२५ कोटी गुंतवणूक झाली.
- देशातील एकूण परकीय गुंतवणुकीत कर्नाटकचा टक्का १४.४ टक्के, गुजरातचा ९.७ टक्के तर तमिळनाडूचा ६.३ टक्के आहे. २०२१-२२ मध्ये देशाने ३१ लाख ४७ हजार २१ कोटी रुपये किमतीच्या मालाची निर्यात केली. त्यातील ५ लाख ४५ हजार ८४ कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राची होती. २०२२-२३ मध्ये हा आकडा आतापर्यंत अनुक्रमे १५ लाख ३४ हजार ४४३ कोटी आणि २४ लाख ७ हजार १४१ कोटी रु. इतका आहे.
६.४९ लाख कोटी रुपये राज्यावरील आता एकूण कर्ज राज्य सरकारने आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा आकडा आता ६ लाख ४९ हजार ६९९ कोटी रुपयांवर गेला आहे. त्याचा दरमाणशी हिशेब केला तर राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर ५० हजार रुपये इतके कर्ज आहे.