सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:19 PM2023-07-04T14:19:32+5:302023-07-04T14:20:34+5:30

आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत असं आमदार संजय शिरसाट म्हणाले.

The government did not need a majority, so why did the NCP take it?; Shiv Sena MLA Sanjay Shirsat told reason | सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

सरकारला बहुमताची गरज नव्हती, मग राष्ट्रवादीला का घेतले?; शिवसेनेने कारण सांगितले

googlenewsNext

मुंबई – राज्यात शिवसेना-भाजपा सरकारला १ वर्षपूर्ती होत असताना पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडला. ज्या अजित पवारांवर आरोप करत शिवसेना आमदारांनी मविआ सरकार पाडले त्याच अजित पवारांना सेना-भाजपा सरकारमध्ये सामील करून घेतले. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे चित्र दिसले त्याचसोबत शिवसेना आमदारांचीही कोंडी झाली.

अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बहुमताची गरज नसताना सरकारमध्ये का घेतले? असा प्रश्न विचारला जाऊ लागला त्यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादीत असंतोष वाढत होता याची जाणीव आधीच होती. त्यामुळे अजित पवार इथं येणार हे माहिती होते. मग सरकार १७२ बहुमत असताना राष्ट्रवादीला सोबत का घेतले असं विचारले जाते. परंतु राजकारणात काही समीकरणे बसवताना, लोकसभा, विधानसभा असेल. पक्षाची ताकद असतेच परंतु वैयक्तिक ताकदही असते. ही ताकद एकत्र झाल्यावर निवडणुका जिंकणे सोपे असते. आम्ही ४५ जिंकू, ४८ जिंकू हे बोलणे सोपे असते पण कसे याचे आराखडे बांधले जातात. तोच आराखडा एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांनी बांधला आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आज जे मंत्रिमंडळ झाले त्यामुळे काहींच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. हे सगळे प्लॅनिंग करून झाले आहे. आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार येत्या रविवारपर्यंत होईल. मंत्रिमंडळाचे विभाजन वाटून समझौत्याने होत आहे. अनेकदा सरकार बनलेली आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राजकारणाला झटका देण्याचे काम या खेळीने झाले आहे असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला.

दरम्यान, आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. येत्या आठवडाभरात तुम्हाला उलगडा होईल. आमच्याकडे जशी मंत्रिपदाची आस लावून आहेत तशी भाजपाकडेही आहेत. राजकारणात काही तडजोडी कराव्या लागतात. नियोजन कसे करावे हे वरिष्ठ नेते ठरवतील. न्याय सगळ्यांना द्यावा लागेल. प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा असते. राष्ट्रवादीसोबत आली म्हणून हात खाली झाले असं नाही. शिंदे-फडणवीस यांचे बोलणे चांगले आहे. कोणाच्या अधिकारावर गदा येणार नाही याची काळजी मुख्यमंत्री घेतील. सत्तेत असले तर वेगळे वलय निर्माण होते. अजितदादा चांगले काम करतील. आम्हाला काही मिळणार नाही असं काही होत नाही असं म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी नाराजीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: The government did not need a majority, so why did the NCP take it?; Shiv Sena MLA Sanjay Shirsat told reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.