शरद पवारांना जोवर भाजपासोबत घेऊन येत नाही तोवर अजित पवार मुख्यमंत्री बनू शकणार नाही, अशी अट मोदींनी ठेवल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज आणखी एक भाकित केले आहे. सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलेल, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि देवेंद्र फडवीसांनी २०२४ पर्यंत शिंदे मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेते काहीही बोलत असतात. ते नवे नवे नेते झाले आहेत. पुढील विधानसभा निवडणुका शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात लढणार आहोत, असे बावनकुळेंनी स्पष्ट केले.
कॅगच्या रिपोर्टमध्ये एक पॅरा आहे. त्यात असे म्हटले आहे. खर्च वाढला की ही संस्था त्यावर खुलासा मागविते. त्यावर उत्तर द्यायचे असते. राज्यातही अनेक रिपोर्टमध्ये तसे होते. यातून नितीन गडकरींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न वगैरे असे काही नाहीय, असे बावनकुळे म्हणाले.
शरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अन्यथा तुम्हाला सीएम पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही . अशी माहिती समोर येतेय. म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचेय यामुळे पवारांना सोबत चला असा आग्रह असू शकेल. यातून त्यांची भेट घेऊन दया याचना करत असतील असे म्हणालायला हरकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा सप्टेंबरमध्ये मुख्य खुर्ची बदलणार असल्याचा दावा केला आहे.