शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

Ahmednagar Lok Sabha Result 2024 : राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 10:13 PM

Ahmednagar Lok Sabha Result 2024 : देशात एनडीएला यश मिळणार असलं तरी महाराष्ट्रात मात्र भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांची दमछाक होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Exit Poll Result Maharashtra ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच्या सर्व सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून निवडणूक निकालाबाबतचा अंदाज वर्तवला आहे. या एक्झिट पोल्सनुसार, देशातील राजकीय चित्र मागील निवडणुकीच्या तुलनेत फारसं बदलण्याची शक्यता नसून पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताने सत्तेवर येण्याची शक्यता आहे. देशात एनडीएला यश मिळणार असलं तरी महाराष्ट्रात मात्र भाजपसह मित्रपक्षांची दमछाक होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही ९ आणि पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला १८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १४, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ६, काँग्रेसला ५ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी घेत असताना काही मतदारसंघात दिग्गजांचा पराभव करत मविआचे उमेदवार 'जायंट किलर' ठरण्याची शक्यता या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

कोणत्या ६ मतदारसंघांत लागू शकतात धक्कादायक निकाल?

१. अहमदनगर दक्षिण

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि नगर दक्षिणची उमेदवारीही मिळाली. तर भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील मैदानात होते. निवडणूक प्रचाराच्या काळात विखे आणि लंकेंमध्ये टोकदार आरोप-प्रत्यारोपही झाले. विविध संस्थांच्या माध्यमातून सुजय विखे यांच्या कुटुंबाची या मतदारसंघात खोलवर पाळंमुळं रोवली गेली आहेत. तर दुसरीकडे, कोरोना काळात आमदार म्हणून केलेल्या कामांमुळे निलेश लंकेंनी चांगलीच लोकप्रियता कमावली आहे. या चुरशीच्या लढाईत आता या मतदारसंघाचा कल निलेश लंके यांच्या बाजूने असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे.

२. सातारा

सातारा हा राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा गड म्हणून ओळखला जातो. २०१९ मध्ये या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र तरीही या मतदारसंघात पवारांचाच उमेदवार निवडून आला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही साताऱ्यातून शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या रुपाने नवा उमेदवार दिला आहे. मात्र तरीही शिंदे हे पवारांचा बालेकिल्ला राखतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

३. माढा

माढा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपने शरद पवार यांना धोपीपछाड देत या मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत पवारांनी आपलं राजकीय कौशल्य दाखवत भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटील कुटुंबाला पुन्हा आपल्याकडे खेचलं आणि भाजपचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली. पवार यांना दाखवलेला हा विश्वास धैर्यशील मोहिते पाटील हे सार्थ ठरवत असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे.

४. नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही ठिकाणी मोठं नाट्य घडलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सुरुवातीला विजय करंजकर यांना ग्रीन सिग्नल देऊन ऐनवेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे, महायुतीत आधी राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली मात्र शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. महायुतीने उमेदवारी घोषित करण्यास बराच काळ लावल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली होती. हीच बाब वाजे यांच्या पथ्यावर पडली असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे.

५. दिंडोरी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली खासदार झालेल्या भाजपच्या भारती पवार यांची थेट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. भारती पवार यांच्या रुपाने दिंडोरीला थेट केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने या मतदारसंघात यंदा भाजपला अडचण येणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने भास्कर भगरे गुरुजी यांना उमेदवारी जाहीर केली आणि दिवसागणिक या मतदारसंघातील गणिते बदलत गेली. कांदा प्रश्न या मतदारसंघात महत्त्वपूर्ण ठरल्याचं दिसत असून भारती पवार यांचा पराभव करून भास्कर भगरे हे जायंट किलर ठरतील, असं टीव्ही ९च्या एक्झिट पोलमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

६. चंद्रपूर

मागील लोकसभा निवडणूक काँग्रेसला राज्यात अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता. विदर्भातील चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांचं दुर्दैवी निधन झालं. यंदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर चंद्रपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच रंगली होती. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या तिकिटासाठी आग्रही होत्या. मात्र अखेर काँग्रेस हायकमांडने बाळू धानोरकर यांच्या प्रत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच संधी दिली. या निवडणुकीत त्यांना सहानुभूतीचा फायदा झाल्याचं दिसत आहे. कारण चंद्रपूर मतदारसंघात त्या भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करतील, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४satara-pcसाताराdindori-pcदिंडोरीahmednagar-pcअहमदनगरmadha-pcमाढाchandrapur-pcचंद्रपूरnashik-pcनाशिकexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी