मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव देण्याची आम्हाला सध्या गरज वाटत नाही, असे सांगत भाजपने गुगली टाकली व पुढची रणनीती काय असेल, याबाबतचे गूढ कायम ठेवले.भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी सायंकाळी झाली. या बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले की, सत्ता समीकरणांबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने वा कोणीही भाजपला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही.
नाना पटोले यांची, उद्धव ठाकरेंशी चर्चाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी रात्री मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू असे पटोले यांनी सांगितले.