सोलापूर - गृहिणी अन् तरुणींचा चढ-उतरणीच्या काळात ओढा राहिलेल्या सोन्याचा भाव मे-जूनदरम्यान चार हजारांनी उतरला अन् दोन महिन्यांत हजाराने वधारत गेला; मात्र चांदी याच काळात पाच हजारांनी आपटून दोन महिन्यांत पाच हजारांनी उसळी घेतली. या उसळीचा सोलापूरच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. याही काळात सोने खरेदीकडे कल राहिला. मागील पंधरा दिवसांत अधिकमासामुळे चांदी खरेदीकडे कल अधिक राहिला.
कोरोनानंतर सोने-चांदीचा दर अस्थिर राहिलेला आहे. अशाही काळात गृहिणींचा, तरुणाईचा प्रतिसाद मिळतोय. त्यानंतर रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाला. याबरोबरच अमेरिकेची मंदीकडे वाटचाल सुरू असून, आंतरराष्ट्रीय पॉलिसी बदलतेय. या साऱ्यांचा परिणाम म्हणून भारतात सोने-चांदीच्या दरावर होता असल्याचे सोलापुरातील सराफा व्यावसायिकांचे मत आहे.
सोने घसरत राहिले, चांदीने उसळी घेतली११ मे : ६२,०००-७६,०००३० जून : ५८,४००-७१,०००१ जुलै : ५८,५००-७१,०००७ जुलै : ५९,०००-७२,०००१२ जुलै : ५९,७००-७५,०००१९ जुलै : ६०,२००-७८,०००२४ जुलै : ५९,८००-७६,०००
धोंडा महिन्यात चांदीला मागणी...दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात अर्थात धोंडा महिन्यात जावई आणि लेक, सुनेला चांदीच्या वस्तू देऊन त्यांचा मान-सन्मान वाढविण्याची प्रथा पाळली जात आहे. या पंधरा दिवसांत चांदीचे निरंजन ताटसह ब्रेसलेट, चेन, जोडवी, छल्ला यांची खरेदी होतेय. याबरोबरच मुलींचा ओढा चार ग्रॅमच्या फॅन्सी टॉप्सकडे, तर श्रीमंत कुटुंबाकडून जावयाला सोन्याची अंगठी दिली जात आहे.