पुणे : गोकुळ अष्टमीनंतर सक्रिय झालेला मान्सून राज्यात मनसोक्त बरसत आहे. खरिपातील कोमेजून गेलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. बरेच दिवस बेपत्ता असलेला पाऊस परतला आणि दाेन दिवसांतच एवढा बरसला की, नाशकात गाेदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होत असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. १४ सप्टेंबरनंतर राज्यात पुन्हा पाऊस वाढेल असा अंदाज आहे.
दोन दिवस यलो अलर्टहवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये राज्यात यलो अलर्ट दिला असून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार व तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.