मुंबई : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, २०१९-२० या वर्षात १८ वर्षांखालील मुलींच्या लग्नाचे प्रमाण राज्यात २१.९ टक्के, तर २१ वर्षांखालील मुलांच्या लग्नाचे प्रमाण १०.५ टक्के असल्याचे समोर आले आहे. देशात हे प्रमाण राज्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असून, मुलींच्या बालविवाहाचे प्रमाण २३.३ टक्के, तर मुलांच्या बालविवाहाचे प्रमाण १७.७ टक्के आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार राज्यात उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, नंदुरबार, पुण्यात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. कुटुंब आरोग्य सर्वेक्षण चारशी तुलना करता ही आकडेवारी कमी असली तरी त्याचे या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम गंभीर असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञही देत आहेत.
लॉकडाउनमध्ये बालविवाहाचे प्रमाणलॉकडाउनमुळे कुटुंबासमोरील उदरनिर्वाहाचा प्रश्न, गरिबी, शाळा-महाविद्यालये बंद असल्याने घरात एकटीच असलेल्या मुलीची चिंता, लॉकडाउन काळात विवाहाच्या खर्चात होणारी बचत, मुलीसाठी आलेले चांगले स्थळ आदी कारणांमुळे पालक मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून देत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देत आहेत. यामध्ये ही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे.राज्य सरकारमार्फत क्राय (चाइल्ड राइट्स) ही संस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात, पाड्यात अंगणवाडीसेविका, आशासेविका यांच्यासह पोलीसपाटील यांच्यासोबत काम करून बालविवाह थांबविण्याचा प्रयत्न करत आहे.
बालविवाहाचे प्रमाणराज्य शहरी ग्रामीण एकूण मुली १५.७ २७.६ २१.९ मुले ९.६ ११.३ १०.५ देश शहरी ग्रामीण एकूण मुली १४.७ २७ २३.३ मुले ११.३ २१.१ १७.७ राज्यातील स्थिती (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ - २०२०- २१)जिल्हा प्रमाण अहमदनगर २६.९ औरंगाबाद ३५.८गडचिरोली १०.१लातूर ३१मुंबई ४.५ नंदुरबार २४उस्मानाबाद ३६.६ पुणे २४वर्धा ९