शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तींसारखी : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 1:20 PM

सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. हे कठीण काम आहे - उपमुख्यमंत्री

रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. दरम्यान, यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका ही एका न्यायमूर्तींसारखी असल्याचं म्हटलं.

“खरं म्हणजे या सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका ही एका न्यायमूर्तींप्रमाणे आहे. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. हे कठीण काम आहे. ज्याच्या बाजूनं निर्णय येतो त्याला न्याय आणि दुसऱ्याला अन्याय वाटतो. पण एका गोष्टीच्या दोन बाजू असतात असं आपण म्हणतो. एक खरी एक खोटी, पण असं नाही एक त्यांची एक आमची बाजू असते. पण एक तिसरी बाजू असते ती खरी बाजू असते आणि त्या खऱ्या बाजूला या ठिकाणी प्रतिध्वनित करण्याचं काम हे अध्यक्षांना करावं लागतं,” असं फडणवीस म्हणाले.

पुलंच्या वाक्याचा उल्लेख"राहुल नार्वेकर देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. तसंच इतिहासात पहिल्यांदाच वरच्या सभागृहात सासरे सभापती आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी जावई असा योगायोग जुळून आला आहे. पु.ल.देशपांडे म्हणायचे जावई आणि सासऱ्याचं कधी पटत नाही. पण तसं इथं होणार नाही. याची आम्हाला खात्री आहे", असं फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसvidhan sabhaविधानसभा