लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - पानटपरी चालक ते मंत्री असा प्रवास करणाऱ्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी सहकार राज्यमंत्री व पाणी पुरवठा मंत्री म्हणून कामकाज सांभाळले आहे.
गुलाबराव पाटील यांचा परिचय
5 जून 1966 रोजी जन्मलेल्या गुलाबराव पाटलांचा मंत्रिपदाचा प्रवास रंजक आहे. एक साधा पानटपरीवाला ते थेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मुसंडी मारली आहे. मात्र, हा पल्ला गाठताना त्यांना प्रचंड संघर्षही करावा लागला आहे.
‘नशीब’ पानटपरीगुलाबराव पाटील हे जळगावजवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. गावरान भाषणांनी सभा गाजवू लागले. फर्डा वक्ता अल्पावधीतच शिवसेनेचा फायरब्रँड नेता म्हणून उदयास आले गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.नाटकांत कामंही केलीगुलाबराव पाटील यांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. गरीबी नुसती पाहिली नाही तर अनुभवली आहे. पोट जगवण्यासाठी त्यांनी ऐन उमेदीत नाटकांत कामं केली.शिंगाडे मोर्चा गाजलागुलाबरावांची आंदोलने हटकी राहिली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्नावर तर त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. त्यांच्या याच आंदोलनामुळे ते लोकप्रिय झाले. अफाट वक्तृत्वामुळे त्यांना खानदेशची मुलुख मैदानी तोफ आणि शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणूनही संबोधले जाऊ लागले. 1992 मध्ये ते पंचायत समिती सदस्य झाले. तर 1997मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009चा अपवाद वगळता ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आले.गुलाबराव पाटील चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. .गुलाबराव पाटील राजकीय कारकीर्द1999 – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले2004 – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी2009 – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड2014 – विधानसभा निवडणुकीत विजयी2016-2019 – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज2019 – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजयमहाविकास आघाडी सरकारच्या काळात सन २०१९ ते २०२२ या कालावधीत महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागाचे विद्यमान मंत्री होते.