शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रुसवे फुगवे सुरूच, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपात प्रत्यय, मुंडे प्रकरणी प्रतिमा डागाळली

By यदू जोशी | Updated: January 21, 2025 08:10 IST

Mahayuti News: विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाप्रचंड यश मिळविल्यानंतर सरकार स्थापनेपासूनची प्रत्येक गोष्ट सहज घडेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रिपदांचे वाटप यावरून रुसवेफुगवे दिसून येत आहेत. 

- यदु जोशीमुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाप्रचंड यश मिळविल्यानंतर सरकार स्थापनेपासूनची प्रत्येक गोष्ट सहज घडेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रिपदांचे वाटप यावरून रुसवेफुगवे दिसून येत आहेत. 

आधी मुख्यमंत्रिपदावरून काही दिवस घोळ चालला, मग विस्तार लांबला, नंतर खात्यांवरून शिंदेसेनेने ताणून धरल्याच्या बातम्या आल्या. आता पालकमंत्रिपदांवरून नाराजीनाट्य रंगले आहे. सरकारकडे भक्कम बहुमत असले तरी ताणतणावाचे प्रसंग अधुनमधून उद्भवत असल्याचे दिसत आहे. 

मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अडीच वर्षांनंतर मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन बदल केले जातील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, तरीही नाराजीचे पडसाद उमटले. शिंदेसेनेचे विजय शिवतारे यांनी जात पाहून मंत्रिपदे दिली हे फार वाईट झाले, या शब्दात नाराजी व्यक्त केली.  

नाराजीची मालिकाचआपल्याला मंत्रिपद मिळत नाही हे लक्षात येताच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी नागपुरात शपथविधी समारंभाला पाठ दाखविली. योग्यवेळी बोलेन असे ते म्हणाले होते.जळगाव जामोदचे पाचवेळचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांना स्थान मिळाले नाही म्हणून त्यांच्या समर्थक पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शविली होती.

अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांना क्रीडा मंत्रिपद मिळाल्याने ते नाराज असल्याची  चर्चा  होती. रायगडचे पालकमंत्रिपद तर तटकरे  व शिंदेसेना यांच्यातील वादाचा मोठा मुद्दा बनला आहे. आमचे राजकारण संपले तरी चालेल, पण अदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, असे शिंदेसेनेचे आ. महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे. यावरून  दावेदार मंत्री भरत गोगावले  कमालीचे अस्वस्थ आहेत. 

मुंडे प्रकरणावरून विसंवादबीडमधील घटनाक्रमांवरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या  राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागली. या निमित्ताने महायुतीत विसंवाद दिसून आला.भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट मुंडे यांच्यावर निशाणा साधत अनेक आरोप केले. भाजपचे इतर काही आमदार मुंडे हटावमध्ये अप्रत्यक्ष सहभागी होताना दिसतात. अजित पवार गटाचे बीडचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनीही मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हटले. यावरून सरकारची प्रतिमा डागाळली. 

भुजबळ यांची उघड नाराजीज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही, त्यावरून त्यांनी ‘कसला दादा अन् कसला वादा’ असा थेट हल्लाबोल अजित पवार यांच्यावर केला होता.त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांचा निषेध करत आंदोलन केले होते. अगदी परवाच्या शिर्डीतील पक्षाच्या अधिवेशनातदेखील भुजबळ यांची नाराजी लपून राहिलेली नव्हती.

टॅग्स :MahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार