शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 5:51 PM

"विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं."

महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष आश्वासनांची खैरात वाटताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तर आश्वासनांची स्पर्धाच बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी मुंबईतून संयुक्त सभेद्वारे सुरुवात झाली. यावेळी, महाविकास आघाडीने जनतेला ५ गॅरंटी अथवा आश्वासने दिली आहेत. यात, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये, महिला व मुलींना मोफत बस प्रवास आणि बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत. आदी योजनांचा समावेश आहे. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

उगाचच काहीतरी सांगायचं...!यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, "विकासासाठी कुठूण पैसा आणणार माहीत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नाही. त्यामुळे यांना तिकडून विकासासाठी फार काही मिळेल अशातला काही भाग नाही. उगाचच काहीतरी सांगायचं. पटेल असं तरी..." एवढेच नाही तर, "आमच्यावर टीका करताना..., आम्ही या सर्व योजना साधारणपणे 75 हजार कोटीपर्यंत घेऊन गेलो होतो. आताच्या त्यांच्या सर्व योजना एकत्रित केल्यानतंर, त्या रकमा आणि ते लाभार्थी बघितले, तर ते जातंय 3 लाख कोटींपर्यंत. ही फॅक्ट आहे," असेही अजित दादा म्हणाले.

ही निव्वळ महाराष्ट्र राज्यातील मतदारांची फसवणूक -तुमचे बघूनच त्यांनी केले, म्हणजे स्पर्धा सुरू झाली? असे विचारले असता, अजित दादा म्हणाले, "स्पर्धा नाही हो, तुम्ही आम्हाला म्हणत होतात की, तुम्ही देऊ शकणार नाही आणि तुम्ही त्याची दुप्पट वाढ, तिप्पट  वाढ, चौपट वाढ करताय. हे कसं मग शक्य आहे? तुम्ही काय जादूची कांडी फिरवणार आहात? काय करणार आहात? हे बरोबर नाही, ही निव्वळ महाराष्ट्र राज्यातील मतदारांची फसवणूक आहे."

  

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी