शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

शिवसेना पक्षाच्या घटनेतच पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही, गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचा शिंदे गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:07 AM

Shiv Sena: केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाेंद झालेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेखच नाही. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते व मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते, असा जोरदार दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मंगळवारी पुन्हा करण्यात आला. 

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नाेंद झालेल्या शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेखच नाही. उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेते व मुख्य प्रतोद निवडीचे कोणतेही अधिकार नव्हते, असा जोरदार दावा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठरावच बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून मंगळवारी पुन्हा करण्यात आला. 

शिवसेना गटनेतेपदावरून शिंदे यांना हटवून आमदार अजय चौधरी यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली. २१ जून २०२२ रोजी झालेल्या या ठरावावर शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. प्रभूंवर जेठमलानी यांच्याकडून प्रश्नांचा भडिमार सुरू असून काेणत्या आधारावर तुम्ही हा ठराव केला, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. 

मी ‘नॅशनल’राष्ट्रीय शक्ती या शब्दाचे भाषांतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘नॅशनल पॉवर’ असे केले. त्यावर महेश जेठमलांनी यांनी हास्य करीत सुनील प्रभूंना ‘नॅशनल’ की ‘अँटी नॅशनल’ असा सवाल केला, त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता ‘मी नॅशनल’ असे उत्तर प्रभूंनी दिले.

..या शक्यतेने नोटिसा  प्रतिज्ञापत्राच्या पहिल्याच ओळीत पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे कोणत्या आधारावर नमूद केले असे विचारत जेठमलानी यांनी खातरजमा न केलेल्या बातम्यांच्या आधारावर आमदारांना बैठकीच्या नोटीस काढण्यात आल्याचा दावा केला. यावर प्रभू यांनी सूरतला गेलेल्या आमदारांकडून आपल्यामागे राष्ट्रीय शक्ती असल्याचा दावा करण्यात आल्याने सरकार अस्थिर होईल या शक्यतेने नोटिसा काढल्याचेस्पष्ट केले आहे.  

आमदार प्रतोदपदावरून हटवूच शकत नाहीत : सुनील प्रभूमुख्य प्रतोद म्हणून ३१ आमदारांनी तुम्हाला पदावरून काढून टाकले. त्यामुळे तुमचा व्हीप लागूच होऊ शकत नाही, या जेठमलानी यांच्या दाव्याला प्रभू यांनी तेवढ्याच शिताफीने उत्तर दिले.  मुख्य प्रतोदपदावरून मला हटवण्याचा अधिकार आमदारांना नाही माझी नियुक्ती पक्षप्रमुखांनी केली आहे. पदावरून काढण्याचेही अधिकार पक्षप्रमुखांचे आहेत, असे ते म्हणाले. 

‘दिलीप लांडे यांची त्या ठरावावरील सही खोटी’ २२ जून २०२२ रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या  बैठकीत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याच्या ठरावाला दिलीप लांडे यांनी अनुमोदन दिले नाही.  त्यामुळे झालेला ठराव खोटा आहे आणि दिलीप लांडे यांनी ठरावावरील सही आणि त्या दिवशीच्या हजेरीपटावरील सही पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. यावर हे खोटे असल्याचे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे