लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 04:51 PM2022-09-12T16:51:02+5:302022-09-12T16:53:56+5:30

Nana Patole : शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे असेही पटोले म्हणाले.

The state government should take an immediate decision to save animals from lumpy diseases, demand of nana patole | लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, नाना पटोलेंची मागणी

लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, नाना पटोलेंची मागणी

Next

मुंबई : अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी. तसेच लम्पी आजाराने ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
  
राज्यातील काही भागातील जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. हा रोग जास्त पसरू नये, यासाठी वेळीच औषधोपचार करणे व हा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. लम्पी आजारावर आवश्यक लसीचा साठा राज्य सरकारने ICMR कडून Lumpy Provac IND लसींचा साठा मागवावा. तसेच जनावरांना लम्पीची लागण होताच उपचार करण्यासाठी लागणारी औषधे राज्य सरकारने केंद्र सरकारडून कडून किंवा खुल्या बाजारातून विकत घ्यावीत, असे नाना पटोले म्हणाले.

लम्पी आजारावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही, तर राज्यातील पशुधनाला मोठा फटका बसून शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. भविष्यातील धोका लक्षात घेता सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु राज्यातील शिंदे फडणीस सरकार गणेशोत्सवात व्यस्त होते आणि अजूनही हार तुरे सत्कार यातच त्यांचा वेळ जात असल्याचे दिसते. सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, परंतु राज्य सरकार त्यांना भरीव आर्थिक मदत देऊ शकले नाही. सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे आणि तीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित सरकार शेतकरी विरोधी आहे, हे दिसून आले आहे. परंतु शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे असेही पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सरकारी व भाडोत्री गर्दी? 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेस गर्दी जमण्यासाठी पैसे वाटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांनी या सभेला हजर रहावे, असे लेखी आदेश महिला व बालकल्याण विभागाने दिल्याचे समजले. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी असे लेखी आदेशाचे पत्र काढण्यामागे कोण आहे, याची चौकशी केली पाहिजे. सभेला गर्दी जमवण्यासाठी शिंदे यांच्यावर ही वेळ यावी हे दुर्दैवच म्हणावे लागले.

Web Title: The state government should take an immediate decision to save animals from lumpy diseases, demand of nana patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.