शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 4:51 PM

Nana Patole : शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे असेही पटोले म्हणाले.

मुंबई : अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी. तसेच लम्पी आजाराने ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  राज्यातील काही भागातील जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. हा रोग जास्त पसरू नये, यासाठी वेळीच औषधोपचार करणे व हा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. लम्पी आजारावर आवश्यक लसीचा साठा राज्य सरकारने ICMR कडून Lumpy Provac IND लसींचा साठा मागवावा. तसेच जनावरांना लम्पीची लागण होताच उपचार करण्यासाठी लागणारी औषधे राज्य सरकारने केंद्र सरकारडून कडून किंवा खुल्या बाजारातून विकत घ्यावीत, असे नाना पटोले म्हणाले.

लम्पी आजारावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही, तर राज्यातील पशुधनाला मोठा फटका बसून शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. भविष्यातील धोका लक्षात घेता सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु राज्यातील शिंदे फडणीस सरकार गणेशोत्सवात व्यस्त होते आणि अजूनही हार तुरे सत्कार यातच त्यांचा वेळ जात असल्याचे दिसते. सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, परंतु राज्य सरकार त्यांना भरीव आर्थिक मदत देऊ शकले नाही. सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे आणि तीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित सरकार शेतकरी विरोधी आहे, हे दिसून आले आहे. परंतु शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे असेही पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सरकारी व भाडोत्री गर्दी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेस गर्दी जमण्यासाठी पैसे वाटल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत व ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांनी या सभेला हजर रहावे, असे लेखी आदेश महिला व बालकल्याण विभागाने दिल्याचे समजले. हा प्रकार गंभीर असून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी असे लेखी आदेशाचे पत्र काढण्यामागे कोण आहे, याची चौकशी केली पाहिजे. सभेला गर्दी जमवण्यासाठी शिंदे यांच्यावर ही वेळ यावी हे दुर्दैवच म्हणावे लागले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण