शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार

By अतुल कुलकर्णी | Published: October 19, 2024 6:19 AM

आज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आहे.

अतुल कुलकर्णी -

मुंबई : विधानसभेच्या मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक २० ते २२ जागा उद्धव ठाकरे शिवसेना तर १२ ते १३ जागी काँग्रेस उमेदवार उभे करेल. एक जागा समाजवादीला तर एक शरद पवार गटाला दिली जाईल. असा फॉर्म्युला पुढे आला आहे.

ठाकरे गटाचे १५ पैकी ८ आमदार मुंबईतील आहेत. त्यात आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), संजय पोतनीस (कलीना), सुनील प्रभू (दिंडोशी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), रमेश कोरगावकर (भांडुप), सुनील राऊत (विक्रोळी) आणि प्रकाश पातर्फेकर (चेंबूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे मुंबईत ४ आमदार आहेत. त्यात अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), झिशान सिद्दिकी (बांद्रा पूर्व) आणि असलम शेख (मालाड पश्चिम), वर्षा गायकवाड लोकसभेवर निवडून आल्यामुळे आणि झिशान सिद्दिकी अजित पवार गटात गेल्यामुळे या दोन जागा काँग्रेसकडे सध्या नाहीत. 

नसीम खान यांच्यासाठी चांदिवली मतदार संघ काँग्रेसला हवा आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून निवडून आलेले दिलीप लांडे शिंदे गटात आहेत. वर्सोव्याचा मतदारसंघ काँग्रेसला माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्यासाठी हवा आहे. या जागी भाजपच्या भारती लव्हेकर विद्यमान आमदार आहेत. ठाकरे गटाने हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडायची तयारी दर्शवली आहे. वर्सोव्यात उद्धव ठाकरे गटाकडे राजूल पटेल, यशोधर फणसे ही दोन नावे आहेत मात्र सुरेश शेट्टींसाठी हा मतदार संघ काँग्रेसला दिला जाईल, असे सांगितले जाते. कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर तर भायखळामधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार आहेत. कुलाबा मतदारसंघही ठाकरे गटाने काँग्रेससाठी द्यायची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसकडे या मतदारसंघासाठी अॅड. रवी जाधव, पुरण दोशी, हिरा देवासी असे काही उमेदवार आहेत. यामिनी जाधव लोकसभेत हरल्या. 

विधानसभेतही शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी भायखळा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांना हवा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे मनोज जामसुदकर, रमाकांत रहाटे, गीता गवळी हे तीन उमेदवार आहेत. ठाकरे गटाने जामसुदकर यांच्यासाठी या जागेचा आग्रह धरला आहे. जोगेश्वरी पूर्वमधून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत चर्चा आहे. वांद्रे पूर्व काँग्रेसने ठाकरे यांच्यासाठी सोडल्याने त्यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. आ. अनिल परब यांनी एका कार्यक्रमात सरदेसाईंचे नाव जाहीर केले आहे.

अंतिम निर्णय दिल्लीतूनच होणारआज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आहे.

३६ पैकी ४ जागा काँग्रेस लढविणार?ठाण्यातल्या १८ पैकी ऐरोली, भिवंडी पश्चिम, तर पालघरमधील वसई, मीरा-भाईंदर अशा ४ जागा काँग्रेसने तर उरलेल्या सर्व जागा उद्धव ठाकरे गटाने लढवाव्यात यालाही तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. रायगडमधील उरणची आणि रत्नागिरीमधील लांजा-राजापूर या दोन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवार