'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच बंडाची सुरुवात झाली'; शहाजी पाटलांचा मोठा खुलासा

By ओमकार संकपाळ | Published: July 6, 2022 06:02 PM2022-07-06T18:02:27+5:302022-07-06T18:11:05+5:30

'अजित पवारांना 1500 तर रोहित पवारांना 750 कोटींचा निधी; आमच्यासोबत दुजाभाव'

'The uprising started when Uddhav Thackeray became the Chief Minister'; Shahaji Patel's big revelation | 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच बंडाची सुरुवात झाली'; शहाजी पाटलांचा मोठा खुलासा

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच बंडाची सुरुवात झाली'; शहाजी पाटलांचा मोठा खुलासा

Next

मुंबई: काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने राज्यात फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांना बंडखोरी का केली आणि निधीमध्ये कशाप्रकारे दुजाभाव केला जायचा, याबाबत त्यांनी माहिती दिली. 

'50 आमदारांना ते आवडलं नाही'
एका वृत्त वाहिनीशी बोलताना शहाजी बाजू पाटील म्हणाले की, 'आमचे हे बंड काल-परवा ठरलेले नाही. याची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच झाली. मविका सरकार कुणालाच आवडले नव्हते. पण आम्ही सांगणार कोणाला, आमचे आमदार म्हणून शपथविधी झाले, नंतर घराकडे गेलो. नंतर अचानक फोन आला आणि मुंबईला बोलावलं. तिथे या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये फिरवलं. उद्धव ठाकरे रात्री यायचे, काही मिनीटे बोलायचे आणि निघून जायचे. आम्हाला तेव्हा काहीच कळतं नव्हतं की, नेमकं चाललंय काय. ज्यांच्या विरोधात आपण लढलो, तिच माणसं सत्तेत सोबत असणार. आता काम कसे होणार, याचाच विचार मनात यायचा.' 

'निधीत दुजाभाव झाला'
'आमच्या 55 पैकी 50 आमदारांना ही आघाडी आवडली नव्हती. राष्ट्रवादी-काँग्रेसवाले आमची कामे करणार नाहीत, अशी अनेक आमदारांना भीती होती. माझे वाद निधीमुळे नाहीत, मला अनेक मंत्र्यांनी निधी दिला. मी आतापर्यंत 70-80 कोटींची कामे केली. पण, बारामतीला 1500 कोटींचा निधी मिळाला. 750 कोटी निधी रोहित पवारांना मिळाला. इतर नेत्यांनाही भरगोस निधी मिळाला. पण, आमच्याबाबत दुजाभाव झाला,' असे शहाजी पाटील म्हणाले. 

'आमच्यावर घाण आरोप केले'
'आम्ही उद्धव ठाकरेंना अनेकदा मनातलं बोलून दाखवलं होतं. वर्षावर बैठक झाली होती, त्यात आम्ही सगळी आकडेवारी मांडली. तिथे सगळ्या खात्यांचे सचिव होते, आम्ही त्यांना आधी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांचे आकडे वाचायला लावले. बंडखोरी केल्यामुळे आमच्यावर अनेक खालच्या पातळीवरचे आरोप झाले. इतकी खालची पातळी, इतकी घाणेरडी भाषा मी कधीच ऐकली नाही. चार महिला आमदार आमच्यासोबत होत्या, त्यांच्यावर वैश्या म्हणून टीका झाली. एका बाजुला परत या म्हणतात आणि दुसऱ्या बाजुला यांची प्रेत आणतो म्हणता,' असंही ते म्हणाले. 

Web Title: 'The uprising started when Uddhav Thackeray became the Chief Minister'; Shahaji Patel's big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.