शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

मतदारांनी एक्झिट पोल फोल ठरवले, देशाचे अन् राज्यातीलही अंदाज चुकले; सट्टाबाजार मालामाल

By उद्धव गोडसे | Published: June 04, 2024 7:25 PM

निकालात उलथापालथ

कोल्हापूर : निवडणूकपूर्व आणि मतदानानंतर विविध संस्थानी जाहीर केलेले एक्झिट पोल मतदारांनी फोल ठरवले. जवळपास सर्वच संस्थांनी भाजप स्वबळावर बहुमत मिळवून महायुती ३५० ते ४०० जागा जिंकेल असे अंदाज वर्तवले होते. राज्यात महायुतीच्या जागा काहीशा कमी झाल्या तरी २५ ते ३० जागा जिंकतील असा अंदाज होता. पण, राज्यात इंडिया आघाडीने मुसंडी मारून एक्झिट पोल खोटे ठरवले. अनेक ठिकाणी निकालात उलथापालथ झाल्यामुळे सट्टेबाजार मात्र मालामाल झाला.मतदानाचा सातवा टप्पा पूर्ण होताच देशभरातील विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप स्वबळावर सत्ता मिळवण्याचा दावा केला जात होता. तर देशभरात महायुती ३५० ते ४०० जागा जिंकेल असे चित्र दाखवले जात होते. इंडिया आघाडीला कुणीच फारसे जमेत धरले नाही. केवळ १२४ ते १६० जागा इंडिया आघाडीच्या पारड्यात जातील असा अंदाज बांधला होता. टीव्ही९-पोलस्ट्रॅट वगळता अन्य संस्थांनी राज्यात महायुतीला पसंती दिली होती. एकमेव टीव्ही९-पोलस्ट्रॅटने महायुतीपेक्षा इंडिया आघाडी जास्त जागा जिंकेल असे भाकीत केले होते. राज्यात एक्झिट पोल सपशेल फेल ठरले.या निकालाने सट्टा बाजारात मात्र मोठी उलाढाल केली. भाजपला एकहाती बहुमत मिळवता आले नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची कमालीची पिछेहाट झाली. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. यामुळे सट्टा बाजारात बुकी मालामाल झाले. सट्टा बाजारात फेव्हरेट ठरलेले काही उमेदवारही पराभूत झाल्याचे दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात याची प्रचिती आली.

असा होता अंदाजसंस्था - एनडीए - इंडिया - इतरइंडिया टुडे-एक्सिस - ३६१ ते ४०१ - १३१ ते १६६ - ८ ते २०एबीपी-सी व्होटर - ३५३ ते ३८३ - १५२ ते १८२ - ४ ते १२टीव्ही९ पोलस्ट्रॅट - ३४२ - १६६ - ३५इंडिया टीव्ही-सीएनएक्स - ३७१ ते ४०१ - १०९ ते १३९ - २८ ते ३८एनडीटीव्ही-जन की बात - ३६२ ते ३९२ - १४१ ते १६१ - १० ते २०इंडिया न्यूज-डी डायनामिक्स - ३७१ - १२५ - ४७रिपब्लिक टीव्ही - ३५९ - १५४ - ३०न्यूज २४-चाणक्य - ४०० - १०७ - ३६

घडले असेएनडीए - २९५इंडिया - २३०इतर - १८

राज्यातही उलटफेरबहुतांश संस्थांनी राज्यात महायुतीला फेव्हरेट ठरवले होते. भाजप १७ ते २२ जागा जिंकेल, तर काँग्रेसला केवळ ३ ते ८ जागा जिंकता येतील असा अंदाज संस्थांनी वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसने १३ जागा जिंकत सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरवले. भाजपला ११ जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे गटानेही १० जागा जिंकून मुसंडी मारत एक्झिट पोल फोल ठरवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Satta Bazarसट्टा बाजार