...तेव्हा अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला होता? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 02:08 PM2021-12-30T14:08:41+5:302021-12-30T14:08:56+5:30

Sharad Pawar News: Devendra Fadanvis यांच्यासोबत ते पहाटेचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाही Ajit Pawar यांना पाठिंबा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. दरम्यान, या चर्चेबाबत आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

... then Ajit Pawar was advised to form a government with Devendra Fadnavis? Sharad Pawar made it clear | ...तेव्हा अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला होता? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं 

...तेव्हा अजित पवार यांना देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला होता? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं 

Next

मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या वेळी झालेल्या त्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, ते सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाही अजित पवार यांना पाठिंबा होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते. दरम्यान, या चर्चेबाबत आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, त्या शपथविधीसाठी मी अजित पवारांना भाजपासोबत पाठवल्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी सरकारच स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, मी अजित पवार यांना फडवणीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी पाठवलं होतं या चर्चेला काहीच अर्थ नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगतलं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी ठाम भूमिका घेतल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. भाजपा शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास तयार नव्हता. त्यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, अचानक शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर काही दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागली होती. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेना आणि भाजपामधील मतभेद वाढू लागले होते.शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा विचार मोदींच्या मनात आला असावा. त्या पार्श्वभूमीवर माझी आणि मोदींची दिल्लीमध्ये भेट झाली तेव्हा महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तशीच इच्छा होती. मात्र मी पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन हे शक्य नाही, याची कल्पना मोदींना दिली. तेव्हा अजूनही विचार करा, असा सल्ला मोदींनी दिला. मात्र मी ठामपणे नकार दिला, असा दावाही शरद पवार यांनी केला. 

Web Title: ... then Ajit Pawar was advised to form a government with Devendra Fadnavis? Sharad Pawar made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.