शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"…तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो", बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 22:33 IST

Balasaheb Thorat : महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबई : विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो, तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाला मोठ्या संकटात लढावी लागली, पक्षाची सर्व बँक खाती गोठवली, काही नेत्यांवर कारवाया केल्या, काहींना अटक केली, अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवली पण जनतेचा प्रतिसाद काँग्रेस इंडिया आघाडीला मिळाला तसेच राहुल गांधी यांच्या संघर्षालाही जनतेने साथ दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने 237 जागा जिंकून भाजपाला रोखले आहे. आजही देशातील वातावरण इंडिया आघाडीचेच असून महाराष्ट्रात काँग्रेस व मविआसाठी चांगले वातावरण आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तर भाजपा मात्र धनदांडग्यांबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुक होत आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस मविआसाठीचे लक्ष्य आहे आणि ही निवडणूक जिंकावीच लागेल. यासाठी सर्वांनी एकजुटीने मतभेद विसरून जातीय धर्मांध शक्तींना पराभूत करायचे आहे. भाजपाच्या राज्यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, अल्पसंख्यांक आदिवासी कोणीही सुखी आणि सुरक्षित नाही. जनतेचे हित जोपासण्यासाठी भाजपाला सत्तेतून खाली खेचलेच पाहिजे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी संघटनात्मक कार्यक्रमांची रुपरेषा आखलेली आहे. 23 जुलै रोजी जिल्हा कमिटींच्या बैठकांचे आयोजन केले आहे. 25 ते 30 जुलै ब्लॉक मिटिंग होतील, तर 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बुथ लेवलच्या बैठका आयोजित करून संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे. लोकसभेला जसे नवे चेहरे दिले तसेच विधानसभेलाही नवीन चेहरे दिले जातील, महिलांनाही संधी दिली जाईल. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांची 20 ऑगस्ट रोजी जयंती आहे. या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल, असेही चेन्नीथला म्हणाले.

याचबरोबर, नाना पटोले म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन उभे केले आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवला आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवले. शेतकरी संकटात आहे. 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही, पण उद्योगपती अनील अंबानी यांचे 1700 कोटी रुपयांचे कर्ज माफ करते. उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर हे असंवैधानिक सरकार पायऊतार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळेच काँग्रेसने देशाचे संविधान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान रक्षणाचा संकल्प केला आहे. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस