पंढरपूर : सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणुकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावातील शेतात पाणी आले नाही तर राजकारणातून निवृत्ती घेईन, असे विधान शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. यानंतर सांगोला येथे आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना राजकीय निवृत्ती विषयी मोठे विधान केले. तसेच, यावेळी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगोल्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून दुष्काळ जाणवत असतो. यामुळे निवडणूकीत जरी पडलो असलो; तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या १४ गावतील शेतात पाणी आले नाही तर राजकीय निवृत्ती घेईन, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला. शिंदे गटाचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. मात्र, शिंदे गटामधील प्रमुख आमदार असलेले आणि "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील", या विधानामुळे फेमस झालेले शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.शहाजीबापूंना शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांनी २५ हजार ३८६ मतांनी पराभूत केले.