नाशिक : विविध जाती, धर्मांचे मोर्चे, कांद्याचे घसरलेले भाव, कुपोषण व आरोग्य असे अनेक प्रश्न तीव्र झाले असून ते सोडवता येत नसल्याने मुख्यमंत्री चिडचिड करू लागले आहेत. विरोधी पक्षात असल्यासारखे वागू लागले आहेत, त्यामुळे चिडचिड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी सत्ता सोडावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.कोपर्डी अत्याचार प्रकरणी दोषींवर मुदतीत दोषारोपपत्र सादर न केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना घेराव घालेल, असेही त्या म्हणाल्या. कांदा परिषदेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. राष्ट्रवादी भवनात त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या म्हणाल्या, ११ आॅक्टोबरला ‘कोपर्डी घटनेला’ तीन महिने पूर्ण होऊन आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजूनही दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यात नेमक्या काय अडचणी आहेत व काय गौडबंगाल आहे, हे मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर जाहीर करावे. (प्रतिनिधी)
...तर मुख्यमंत्रिपद सोडा - सुप्रिया सुळे
By admin | Published: October 06, 2016 5:26 AM