शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

...तर काढून टाका : शिवसेना

By admin | Published: November 17, 2016 5:38 PM

नको असेन तर काढून टाका, असे खुले आव्हान शिवसेना राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी सेनेच्या हायकमांडला दिले आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 17 : नको असेन तर काढून टाका, असे खुले आव्हान शिवसेना राज्यप्रमुख सुदिप ताम्हणकर यांनी सेनेच्या हायकमांडला दिले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी सलगी करणारा कोणताही पक्ष असो, त्या पक्षाच्या नेहमीच मी विरोधात काम करणार आहे. गोवा राज्यप्रमुखपदी नियुक्ती करताना सेनेच्या मुंबईतील नेत्यांनी मगोशी सलगीबाबत आपल्याला अंधारात ठेवले, असा आरोपही ताम्हणकर यांनी केला आहे.

अवघ्या काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदी नियुक्ती झालेले ताम्हणकर सेनेला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त गेले काही दिवस पसरले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्याबाबत त्यांना बोलते केले. ताम्हणकर म्हणाले की, आपले जे काही म्हणणे आहे ते मुंबईतील नेत्यांना कळविले आहे. पदावरुन काढून टाकले तरी पर्वा नाही. नको असेन तर खुशाल काढून टाकावे.ताम्हणकर यांना अंधारात ठेवून राज्य उपप्रमुख नेमण्यात आला त्यानंतर ही धुसफूस वाढली. अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष असलेले ताम्हणकर यांच्या मनात मगोचे सर्वेसर्वा तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याबद्दल सुरवातीपासून अढी आहे. वाहतूक खात्यात ढवळीकर यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. खात्यातील लांच लुचपतीचा पैसा ढवळीकराकडे जातो, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

गोवा सुरक्षा मंच पक्षालाही इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचने नुकत्याच स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंचला ताम्हणकर यांनी पक्ष स्थापनेच्यावेळी मुद्दाम उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला होता. गोसुमंने मगोशी सलगी केल्यास तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यापासून फारकत घेतल्यास या पक्षाचे समर्थनही आपण काढीन, असे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले आहेत.