"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:32 AM2024-11-13T10:32:22+5:302024-11-13T10:33:55+5:30

Bacchu Kadu: विधानसभा निवडणुकीत जाती-धर्माच्या मुद्द्यावरून प्रचार होताना दिसत आहे. यावरून बच्चू कडूंनी भाजप-काँग्रेसवर हल्ला चढवला. 

"...then the hand will not be broken"; Bachu Kadu's warning to Congress-BJP | "...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा

"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा

Bacchu Kadu News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढला असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत ध्रवीकरणाचा मुद्दाही चर्चेत असून, बच्चू कडूंनी याला काँग्रेस आणि भाजपला जबाबदार धरले आहे. भाजप-काँग्रेसच्या मनगटात ताकद नाही म्हणून जातीपातीचं राजकारण करत आहेत, असे बच्चू कडू म्हणाले. 
 
एका प्रचारसभेत बोलताना बच्चू कडूंनी जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहण्याचं आवाहन मतदारांना केलं. 

हात तोडल्याशिवाय राहणार नाही- बच्चू कडू

बच्चू कडू म्हणाले, "लूट आणि लुटमारी लक्षात घ्या. जातीपाती, धर्माचं तुमच्या डोक्यात टाकणारे लक्षात घ्या. ज्यांच्या मनगटात जोर नाही, भाजपवाले-काँग्रेसवाल्यांना मी सांगतोय. तुमच्या मनगटात जोर नाही म्हणून तुम्ही आम्हाला जात आणि धर्म सांगत असाल, तर ते हात तोडल्याशिवाय राहणार नाही सांगतोय", असा इशारा बच्चू कडूंनी दिला.

परिवर्तन महाशक्ती मैदानात

बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. तिन्ही पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. 

Web Title: "...then the hand will not be broken"; Bachu Kadu's warning to Congress-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.