Bacchu Kadu News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढला असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत ध्रवीकरणाचा मुद्दाही चर्चेत असून, बच्चू कडूंनी याला काँग्रेस आणि भाजपला जबाबदार धरले आहे. भाजप-काँग्रेसच्या मनगटात ताकद नाही म्हणून जातीपातीचं राजकारण करत आहेत, असे बच्चू कडू म्हणाले. एका प्रचारसभेत बोलताना बच्चू कडूंनी जातीपातीच्या राजकारणापासून दूर राहण्याचं आवाहन मतदारांना केलं.
हात तोडल्याशिवाय राहणार नाही- बच्चू कडू
बच्चू कडू म्हणाले, "लूट आणि लुटमारी लक्षात घ्या. जातीपाती, धर्माचं तुमच्या डोक्यात टाकणारे लक्षात घ्या. ज्यांच्या मनगटात जोर नाही, भाजपवाले-काँग्रेसवाल्यांना मी सांगतोय. तुमच्या मनगटात जोर नाही म्हणून तुम्ही आम्हाला जात आणि धर्म सांगत असाल, तर ते हात तोडल्याशिवाय राहणार नाही सांगतोय", असा इशारा बच्चू कडूंनी दिला.
परिवर्तन महाशक्ती मैदानात
बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती, संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. तिन्ही पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे.