...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:00 PM2024-11-12T13:00:31+5:302024-11-12T13:02:26+5:30

"त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही..." 

then we will not tolerate this Devendra Fadnavis direct warning to Mahavikas Aghadi along with Owaisi Love Jihad razakar | ...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा


मला समजलं, आज या मतदारसंघांमध्ये ओवेसी आले होते. ओवेसींनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी देखील पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे. अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका. ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं, त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाढून टाकू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवेसींना दिला आहे. ते मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात महायुतीच्या प्राचर सभेत बोलत होते.

 फडणवीस म्हणाले, "अरे आम्ही कोण्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुल टाकत असेल तर लक्षात ठेवा, आमच्या संभाजी राजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडग देखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं. पण मराठ्यांना औरंगजेब कधी हरवू शकला नाही. त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही." 

या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार - 
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "अरे आम्ही विकास करू, हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, सगळ्यांचा विकास करू. पण तुम्ही, जर या ठिकाणी उलेमांच्या त्या ठिकाणी १७ मागण्या, काय मागण्या आहेत? वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या लोकांना जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, १० टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, या १७ मागण्या, ज्या मागण्या देश हिताच्या मागण्या नाहीयेत." एवढेच नाही तर, "त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही," अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला.

तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं -
"या ठिकाणी जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. व्होटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Web Title: then we will not tolerate this Devendra Fadnavis direct warning to Mahavikas Aghadi along with Owaisi Love Jihad razakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.