आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : इकडे महाराष्ट्रातल्या उमदीसारख्या गावामध्ये एकही माणूस मराठीत बोलत नाही़ मग, तुम्हाला कशाला पाहिजे बेळगाव़़़़अशी मुक्ताफळे भाजपाचे खासदार शरद बनसोडे यांनी सोलापुरात उधळली़ त्याचबरोबर त्यांनी सीमाप्रश्नी आक्रमक राहिलेल्या मित्रपक्ष शिवसेनेलाही डिवचले़ सोलापुरात आज संपन्न झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन बोलताना खा़ शरद बनसोडे यांनी वरील वादग्रस्त विधान केले़ ते म्हणाले, मुंबईचे आमचे काही मित्र बेळगाव मागतात़ आमच्या सांगलीजवळ जत तालुक्यात २५ हजार लोकवस्तीचे उमदी हे गाव आहे़ या गावात एकही माणूस मराठीत बोलत नाही, मग आम्हाला कशाला हवाय बेळगाव, असा सवालही त्यांनी केला़ आमच्या मित्राला विचारले कधी गेला होतास का उमदीला? तर तो म्हणाला, कधीच नाही़ हे असं आहे़ अशा शब्दात खा़ बनसोडे यांनी सीमाप्रश्नी आपली भूमिका मांडली़ यावेळी उपस्थित अनेकांच्या भूवया उंचावल्या़ विशेष म्हणजे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील, आ़ बी़आऱपाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर होते़ खा़ बनसोडे यांनी कानडीत के लेल्या जोशपूर्ण भाषणात सीमाप्रश्न छेडला आणि शिवसेनेचे नाव न घेता बेळगावप्रश्नी सेनेला डिवचले़ त्यांच्या या भूमिकेनंतर उपस्थितांमध्ये चलबिचल सुरु झाली़ आ़ बी़ आऱ पाटील यांनी बेळगाव प्रश्नी बोलताना आपण आता फार पुढे गेलोय़ तो विषय कधीच मागे पडला आहे़ असे सांगत सीमाप्रश्नावर पडदा पडल्याचे सूचित केले़
मग कशाला मागताय बेळगाव ? सोलापूरच्या खासदार शरद बनसोडे यांची मुक्ताफळे
By admin | Published: July 08, 2017 9:15 PM