लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आणीबाणीच्या लढ्याचे विस्मरण म्हणजे पुन्हा एकदा आणीबाणीला निमंत्रण. त्यामुळे त्या लढ्याच्या स्मृती जागविणे सदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.भाजपाच्या वतीने सोमवारी मुंबईत आणीबाणीविरोधी दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी सुरेश प्रभू बोलत होते. आणीबाणी विरोधातील संघर्षात सहभागी झालेल्या, तसेच तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचा या वेळी प्रभू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.सुरेश प्रभू म्हणाले की, ‘तत्कालीन इंदिरा सरकारने लादलेली आणीबाणी खऱ्या अर्थाने जनतेने उधळून लावली. आणीबाणीच्या विरोधातील जनआंदोलन अभूतपूर्व स्वरूपाचे होते. ५८ दिवसांच्या आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी आणि तत्कालीन आणीबाणी समर्थकांच्या विरोधातील रोष जनतेने मतपेटीतून व्यक्त केला. १९७७च्या निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जी ऊर्जा होती, जो जोश होता, तो पुन्हा कधी फारसा पाहायला मिळाला नाही. आणीबाणी उलथून लावण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा होता, असेही प्रभू यावेळी म्हणाले.
...तर पुन्हा मिळेल आणीबाणीला निमंत्रण
By admin | Published: June 27, 2017 2:23 AM