शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

... तर अजितदादा तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही; मोदींची अट असल्याचा वडेट्टीवार यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:08 AM

अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील गुप्त भेटींवर आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कालच दोन प्रस्तावांचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता.

शरद पवार सोबत आले नाहीत तर तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, अशी अट मोदींनी अजित पवारांना घातली आहे, असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

शरद पवार आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल अन्यथा तुम्हाला सीएम पदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही . अशी माहिती समोर येतेय. म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री व्हायचेय यामुळे पवारांना सोबत चला असा आग्रह असू शकेल. यातून त्यांची भेट घेऊन दया याचना करत असतील असे म्हणालायला हरकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 

वडेट्टीवार यांना मोदींच्या मनात काय सुरु आहे हे समजत असेल तर मग काँग्रेसने विरोधी पक्षनेता का केले असा प्रश्न पडेल. मोदींच्या एवढा जवळचा नेता विरोधी पक्षनेते पदी आला आहे. मोदींनी अशी अट घातली असती तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदी कसे बसले असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसह राजकीय परिस्थिती पाहता मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी अजित पवारांसारखे नेतृत्व असलेला नेता सोबत असण्याची आवश्यकता आहे. अजित पवारांमुळे राज्याच्या विकासात गती येऊ शकते या विचारातून सरकारच्या प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे, असे अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले. 

अजित पवारांनी काकांसमोर दोन प्रस्ताव ठेवले? शरद पवारांना केंद्रात कृषी खाते आणि निती आयोगाचे चेअरमनपद अशा २ ऑफर अजितदादांसोबतच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. परंतु शरद पवारांनी या दोन्ही ऑफर नाकारल्या असं त्यांनी सांगितले. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून आतापर्यंत ३-४ वेळा या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. शरद पवारांना एनडीएकडे वळवावे अशी यामागची भाजपाची रणनीती असल्याचे दिसून येते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनाही सामावून घेण्यासाठी शरद पवारांना ऑफर दिली. अलीकडेच अजित पवारांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यातून शरद पवारांना ही ऑफर कळवावी असा निरोप अजितदादांना देण्यात आला, असा दावा काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी