शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज्यभरातून ९३७ ग्रंथपालन परीक्षार्थी, सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिकमधून परीक्षेला विद्यार्थीच नाहीत

By admin | Published: June 03, 2017 4:53 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : डी़एड़ समकक्ष समजल्या जाणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेला १ जूनपासून सुरुवात झाली आहे़ राज्यभरातून ९३७ तर सोलापूर जिल्ह्यातून ८९ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत़ विशेषत: अहमदनगरमधून सर्वाधिक १०२ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत तर दुसरीकडे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य सत्कर्मी लावणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या साताऱ्यासह पाच जिल्ह्यांतून एकही परीक्षार्थी तयार झाला नाही हा विरोधाभास पुढे आला आहे़ डी़एड़ समकक्ष समजल्या जाणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने चालविला जातो़ प्रत्येक जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत हा अभ्यासक्रम शिकवला जातो़ दहावी उत्तीर्णनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो़ सोलापूर जिल्ह्यातून ८९ जण नव्याने परीक्षा देत आहेत तर ३९ पुनर्परीक्षार्थी आहेत़ सोलापूरमध्ये सिद्धेश्वर कन्या प्रशालेत ७ जूनपर्यंत सात विषयांसाठी ही परीक्षा चालणार आहे़ दोन पर्यवेक्षक या केंद्रांवर नियुक्त करण्यात आले आहेत़ --------------------------जिल्हा आणि परीक्षार्थीअकोला (६०), अमरावती (२५), बुलढाणा (२५), वाशिम (२८), यवतमाळ (२८), तुळजापूर (३८), औरंगाबाद विभाग (०५), औरंगाबाद (०८), जालना (३२), परभणी (५०), हिंगोली (२५), लातूर (५७), आंबेजोगाई (३६), नांदेड (२०), नागपूर (२९), वर्धा (१५), अहमदनगर (१०२), धुळे (१५), नंदुरबार (३५), जळगाव (२०), कोल्हापूर (१२), सोलापूर (८९), पुणे (३५), इस्लामपूर (१२), ठाणे (५९), कुडाळ (२५), बृहन्मुंबई (८०), रायगड (३३), रत्नागिरी (०८)----------------------सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिकमधून विद्यार्थीच नाहीतयंदा प्रथमच काही जिल्ह्यांच्या बाबतीत ग्रंथपालन परीक्षेबाबत विरोधाभास स्थिती पुढे आली आहे़ सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्ह्यातून परीक्षार्थीच निर्माण झाले नाहीत़ त्यामुळे या जिल्ह्यांनी यंदा परीक्षेसाठी परवानगीच घेतली नाही़ मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आयुष्य सत्कर्मी लावणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जिल्ह्यात परीक्षार्थीच तयार झाले नाहीत़ वर्षभरात दोन-चार विद्यार्थी आले की तेवढ्या कमी विद्यार्थ्यांसाठी तेथे परीक्षा घेतल्या जात नाहीत़ गं्रथालय चळवळीपुढे हा एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे़ --------------------अत्यंत महत्त्वाचा कोर्स कमी शिक्षण पात्रतेवर, कमी कालावधीचा, थोड्याशा आर्थिक खर्चाचा असून शाळा, महाविद्यालये, वाचनालये यांच्याशी संपर्क ठेवून विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे़ विद्यार्थी न मिळाल्याने वर्गच बंद ठेवणे गैरसोय तर आहेच, वाचन संस्कृ ती आणि ग्रंथालय चळवळीला अप्रत्यक्षरित्या बाधा आणण्याचा प्रयत्न आहे़- कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र