शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

राज्यातील अकरा कोटीचे रस्ते आहेत तरी कुठे ? : अजित पवार

By admin | Published: October 27, 2016 6:01 PM

राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २७  : मेक इन इंडियाचा नारा देणारे भाजप सरकार फसवे सरकार आहे़ सरकारने जाहीर केलेल्या योजना सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत़ राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, जि प अध्यक्षा जयमाला गायकवाड, माजी अध्यक्ष बळीराम साठे, समाजकल्याण सभापती कल्पना निकंबे, जि प च्या कृषी समितीचे सभापती आप्पाराव कोरे, महात्मा फुले सूत गिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे, जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि. प सदस्य जालिंदर लांडे राष्ट्रवादीचे ता अध्यक्ष प्रकाश चवरे उपाध्वक्ष हेमंत गरड फेडरेशनचे संचालक भारत गुंड माजी सभापती भारत गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, गट नेते प्रमोद डोके नगरसेवक मुस्ताक शेख, तानाजीराजे खताळ, सज्जन पाटील, काकासाहेब भोसले, सतोष वायचळ, आण्णा फडतरे, संतोष सुरवसे, माजी उपसभापती मानाजी माने, महेश पवार, शशीकांत पार्टील, विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्र व राज्यसरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतमालाला योग्य दर नाही, उद्योग धंदे मोडकळीस आलेले आहेत वेगवेगळ्या योजनाचे अमिश दाखवून सर्व सामान्य जनतेची फसवणुक करणाऱ्या शासनाच्या विरोधात जनतेचा उद्देक झाला तर याला शासन जबाबदार राहील आसा इशारा देत या सरकारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासाठी बांधण्यात आलेल्या उजनी धरणातील पाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना योग्य नियोजन करुन वाटप करत होते परंतू राज्यातील भाजपाचे शासन त्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करेल असे वाटत नाही. शासनाने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास अडचणीत सापडलेला शेतकरी पून्हा संकटात सापडनारआहे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करने हे आमचे कतव्य असुन योग्य नियोजन न केल्यास पाण्याच्या प्रश्नासाठी आपण शेतकऱ्यांबरोब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले़ आरक्षण देणारे सरकार आता गप्प का...भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणणारे सत्तेत आल्या नंतर मात्र चिड़ीचुप बसले आहेत. त्याच प्रमाणे मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला ही सत्ताधाऱ्यांनी बगल दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला व दुधाला भाव नाही़ दुष्काळात जनतेला सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. तरुणांना हाताला काम नाही़ त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसच सुरक्षित नसतील तर इतर लोकांना संरक्षण कोण देणार? महिलावरील होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे.