मुंबई : वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणाला परवानगी आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच त्यांची स्टाॅलवर विक्री सुरू राहणार आहे. या व्यवसायाशी निगडित सर्व विक्रेते आणि कर्मचाऱ्यांना रेल्वेसह बस, टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करता येईल.वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवाच असून वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. स्टाॅलवर वृत्तपत्रांची विक्री करता येईल तसेच घरोघरी वृत्तपत्रे टाकताही येणार आहेत. वृत्तपत्रांशी निगडीत सर्व विक्रेते आणि कर्मचाऱ्यांना रेल्वे आणि बसने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. पोलीस प्रशासनासह संबंधित महापालिका आणि जिल्हा परिषदांना वृत्तपत्र विक्रेत्यांना सहकार्य करण्याबाबतच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.छपाईसोबतच वितरणालाही परवानगीकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत १५ दिवसांची संचारबंदी लागू केली. या निर्बंधातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. अत्यावश्यक सेवांच्या यादीत वृत्तपत्रे, नियतकालिके आणि मासिकांचा समावेश आहे. वृत्तपत्रांच्या छपाईसह विक्री आणि वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वृत्तपत्रांची कार्यालये तसेच प्रिंटिंग प्रेस या कालावधीत चालू राहणार आहेत. वृत्तपत्रांच्या छपाईसोबतच त्यांच्या वितरणालाही परवानगी आहे. पूर्वीप्रमाणेच स्टाॅलवर वृत्तपत्रांची विक्री करता येईल. यासंदर्भात प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचा गैरसमज झाल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्र वितरणासह वृत्तपत्र विक्रीला स्टाॅलवर बंदूक नसल्याचे शासकीय आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
स्टाॅलवर वृत्तपत्रांच्या विक्रीवर निर्बंध नाहीत, वृत्तपत्र अत्यावश्यक सेवाच; विक्रेते, कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 2:12 AM