कसारा : महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र रेस्ट रूम, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह तत्काळ बांधण्यात यावे, असा अध्यादेश राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वीच काढला असला तरीही ठाणे जिल्ह्यातील अनेक महिला पोलिसांना आजही या मूलभूत सुविधांविनाच काम करावे लागत आहे. कसारा, शहापूर, टिटवाळा, टोकावडे, किन्हवली, पडघा, गणेशपुरी, मुरबाड, भिवंडीतील जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांत हीच परिस्थिती आहे.ठाणे जिल्'ातील पोलीस ठाण्यांमध्ये आजही महिलांसाठी शासनाने बंधनकारक केलेल्या कुठल्याही सुविधा नाहीत. जिल्'ात महिला पोलिसांची संख्या लक्षणीय आहे. एखादी महिला पोलीस बंदोबस्तासाठी किंवा अन्य कामासाठी दुसऱ्या पोलिस ठाण्यात किंवा परिसरात गेल्यास तिला परिचितांचे घर गाठावे लागते. ठाण्यातील बुहतेक पोलीस ठाणी ३० बाय ४० एवढ्याच जागेत बांधण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेकदा संगीत खुर्चीच खेळावी लागते. त्यामुळे स्वच्छतागृहांसाठी जागाच नाही. जागा उपलब्ध असतानादेखील जिल्ह्यातील शहापूर, कसारा, पडघा, गणेशपुरी, भिवंडी, किन्हवली, टोकावडे, टिटवाळा, मुरबाड या पोलीस ठाण्यांत महिलांसाठी स्वतंत्र योजना कार्यान्वित नाही़ (वार्ताहर)
महिला पोलिसांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत
By admin | Published: September 23, 2014 5:14 AM