नाशिक : न्यायालयाने सुचविलेल्या मध्यस्थी केंद्रामध्ये साध्वी त्रिकाल भवंता यांनी आखाड्यांच्या शाहीस्नानाव्यतिरिक्त इतर तारखांचा प्रस्ताव देऊनही एकमत होऊ न शकल्याने त्रिकाल भवंता यांच्या दाव्यावर मंगळवारपासून वरिष्ठ स्तर जिल्हा न्यायाधीश राजेश पटारे यांच्या न्यायालयात नियमित सुनावणी सुरू झाली आहे़साध्वीचे वकील प्रशांत जोशी व गोपीनाथ तिडके यांनी न्यायालयात साध्वीची बाजू मांडली़ त्यामध्ये मध्यस्थी केंद्रात मूळ मागणी बदलून नवीन प्रस्ताव सादर केला़ प्रामुख्याने आखाड्यांच्या शाहीस्नानाच्या तारखांव्यतिरिक्त इतर तारखांची मागणी केली, मात्र प्रशासन एकाही मागणीबाबत सकारात्मक नाही़ प्रशासनाला साध्वींना स्वतंत्र स्नानासाठी व्यवस्था करण्यास नेमकी अडचण काय, असा सवालही साध्वीच्या वकिलांनी केला़उज्जैन, हरिद्वारचे पथक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी उज्जैन व हरिद्वार येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशकात दाखल झाले आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा आटोपल्यानंतर उज्जैन येथे पुढच्या वर्षी कुंभमेळा भरणार आहे व त्यानंतर हरिद्वार येथे असेल़ परंतु तत्पूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने साधू-महंत तसेच लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी काय व्यवस्था केली व कशी केली, तसेच केलेल्या कामांची उपलब्धता याची माहिती हे पथक घेणार आहे.
साध्वींच्या शाहीस्नानाबाबत दावा सुरू
By admin | Published: September 09, 2015 12:29 AM