आनंद मांडवे, सिरोंचा (गडचिरोली)गोदावरी नदीवर होऊ घातलेल्या मेडिगड्डा धरणाची उंची अद्याप निश्चित झालेली नाही. सिरोंचा तालुक्यातील क्षेत्र बुडीत ठरणार असल्याने स्थानिक संभ्रमावस्थेत असण्याबरोबरच चिंतितही आहेत. धरणाची उंची तेलंगण सरकारने जाहीर करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.मेडिगड्डा धरणाविषयी १९ मार्च रोजी हैदराबाद येथे पार पडलेल्या आंतरराज्यीय बैठकीत धरणाची उंची १०३ऐवजी १०० मीटर निश्चित करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. ९८ मीटरपर्यंत दरवाजे राहतील व पुलाचे अतिरिक्त पाणी सोडले जाणार असल्याने बुडीत क्षेत्र होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.आता धरणाची उंची आता १०१ मीटर राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाढलेल्या १ मीटरने नुकसान किती होईल, याबाबत चिंता व्यक्त होत आहे. तथापि १०१ मीटरच्या उंचीने गोदावरीच्या काठापर्यंत पाणी राहील. या संतुलित पाण्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल, असे तेलंगणचे अधिकारी सांगत आहेत.राज्य शासनाचेही दुर्लक्षसिरोंचा तालुक्यात प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या मोठ्या नद्या आहेत. मात्र या नद्यांच्या पाण्याचा सिंचनासाठी काहीच उपयोग झाला नाही. याउलट दरवर्षीच्या पुरामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. तेलंगण सरकार मात्र प्रकल्प उभारून गोदावरी नदीच्या पाण्याचा पुरेपूर उपयोग करणार असल्याचे दिसून येत आहे.
मेडिगड्डा धरणाच्या उंचीबाबत संभ्रम कायम
By admin | Published: May 09, 2016 4:05 AM