शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने संभ्रम वाढला

By admin | Published: July 13, 2017 5:41 AM

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यावर, आता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची लगबग सुरू आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यावर, आता सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची लगबग सुरू आहे, पण अनेक विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या अथवा तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे आता प्रवेश घ्यायचा की नाही, याविषयी स्पष्टता नसल्याने गोंधळलेल्या स्थितीत आहेत, पण अनेक महाविद्यालयांत सीनियर्स या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. मुंबई विभागातील अकरावी आॅनलाइन प्रेवश प्रक्रिया पहिल्यापासूनच गोंधळामुळे सतत चर्चेत राहिली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा संकेतस्थळात व्यवस्थित सुरूहोते. दुसरा अर्ज भरताना मात्र, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. रडतखडत अर्ज भरणे पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण त्यानंतर पहिली यादी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. सोमवारी सायंकाळी यादी जाहीर न झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेशाचे मेसेज गेले. यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारची रात्र जागून मंगळवारी सकाळी महाविद्यालय गाठले, पण त्यानंतर, हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे समजले. मग या परिस्थिती प्रवेश न घेतल्यास, दुसऱ्या यादीत नाव येईल का, असा प्रश्न मनात सतावत असल्याने, विद्यार्थी काही प्रमाणात तणावात आहेत. दुसरीकडे प्रवेश घेतल्यास प्रक्रियेतून बाहेर पडू आणि हवे ते महाविद्यालय मिळणार नाही, म्हणून काही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यांनी प्रवेश न घेतल्यास, विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडेल. विद्यार्थी महाविद्यालयात आल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी काही महाविद्यालयांनी हेल्पडेस्क सुरूकेला आहे. सीनियर विद्यार्थी अथवा काही ठिकाणी प्राध्यापक विद्यार्थी आणि पालकांना मदत करत असल्याचे चित्र आहे.>प्रवेशासाठी वेळ वाढविण्याची मागणीअकरावीची पहिली यादी मध्यरात्री १ वाजता जाहीर झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी प्रवेश मिळाला की नाही, याची माहिती मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी जाता आले नाही. आता विद्यार्थ्यांना दोनच दिवस मिळणार. त्यामुळे प्रवेशासाठी वेळ म्हणजेच दिवस वाढवून देण्याची मागणी मनविसेतर्फे करण्यात आली आहे, पण गुरुवारी शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन, नंतर निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.