शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

पंतप्रधानपदाची गरीमा आहे, पंजाबमध्ये जे घडले त्याचा आम्ही निषेधच करतो: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 6:09 PM

'पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचेल?'

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह विविध विषयांवर भाष्य केले.

भाजप गरीमा घालवतंययावेळी नाना पटोले म्हणाले, मी आज सकाळी आणि परवाही बोललो की, पंतप्रधानपदाची एक गरीमा आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांसोबत घडले त्याचा आम्ही निषेधच करतो. पण, जो कार्यक्रम आधी ठरला होता, तो शेवटच्या क्षणी का बदलला हा प्रश्न आहे. या पंतप्रधान पदाची गरमी घालवण्याचे काम भाजपच करतंय. त्याविरोधात आम्ही बोलणार आणि त्यासाठी माझ्याविरुद्ध तक्रारी झाल्या तरी चालतील, असं पटोले म्हणाले. 

ऐनवेळी मार्ग बदलणे चुकीचेयावेळी पटोलेंनी केंद्रीय यंत्रणांवरही टीका केली. केंद्रीय सुरक्षा विभागाने पंतप्रधानांचा जो कार्यक्रम ठरवला होता, त्यावर कायम राहायला हवे होते. ठरलेला मार्ग ऐनवेळी बदलणे चुकीचे आहे. हा कार्यक्रम बदलणारी केंद्रीय तपास यंत्रणा आहे, आणि त्या दिवशी जे घडले, त्यालाही केंद्रीय सुरक्षा यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचेल ? असा सवाल पटोलांनी केला.

निवडणूक आयोग निर्णय घेईलयावेळी पटोलांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाने घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुका लावल्या. आता आणखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. निवडणूक आयोग सर्वेसर्वा आहे, दिल्लीतून जसा इशारा होईल त्याप्रमाणे निवडणुका लागतील, असे ते म्हणाले.

रश्मी ठाकरेंना ट्रोल करणे लांछनास्पदयावेळी नाना पटोलेंनी रश्मी ठाकरेंवर झालेल्या वादग्रस्त टीकेवरही भाष्य केले. अमृता फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांना पकडले होते. महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण काल रश्मी ठाकरे यांना ज्या पद्धतीने ट्रोल केले ते लांछनास्पद आहे. देवेंद्र फडणवीस नाशिकला गेले तेव्हा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यावरही आम्ही कारवाई केली होती, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी