शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
2
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
3
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
4
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
5
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
6
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
7
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
8
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
9
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
10
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
11
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
12
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
13
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
14
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
15
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
16
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
17
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
18
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
19
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
20
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  

लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोर होण्याची शक्यता, डिसेंबरच्या हप्त्याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 1:24 PM

निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून योजना राबविली गेली. पण, 

सांगली : नवे सरकार सत्तारूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून योजना राबविली गेली. पण, आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेला चाळणी लावली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. घरात चारचाकी वाहन, आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता, तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यांवर पैसे जमा झाले. लाभार्थी महिलांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा नियम होता, तोदेखील पाळला गेला नाही. ग्रामसभांत यादीचे वाचन झालेच नाही.सांगली जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख महिला योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. काही महिला पात्र असूनही तांत्रिक कारणास्तव त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आता नवे सरकार सत्तारूढ होताच योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू होऊन त्यांच्या खात्यांवर पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोर केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांना १५०० रुपयांवरून आता २१०० रुपये दिले जाणार आहेत, त्यामुळे हा बोजा आणखी वाढणार आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले. मात्र, आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता निकालानंतर लाडक्या बहिणींचे लक्ष हप्त्याकडे लागले आहेत. आता १५०० रुपये मिळणार की २१०० याचीही उत्सुकता आहे.

दुबार लाभ टाळण्याचा प्रयत्नया लाभार्थ्यांमधून आयकर भरणारे, घरात चारचाकी वाहन असणारे वगळले जाण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणारे कुटुंब योजनेसाठी पात्र नाही, तरीही त्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे. याचीही छाननी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाGovernmentसरकार