"मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 05:18 PM2024-08-07T17:18:56+5:302024-08-07T17:19:28+5:30

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

"There is no 'little brother, big brother' party in Mahavikas Aghadi", said Nana Patole clearly   | "मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले  

"मविआमध्ये कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय... ’’, नाना पटोले स्पष्टच बोलले  

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला धक्का दिला आहे. स्वयंघोषित विश्वगुरु यांनीही राज्यात १७ जाहीर सभा घेतल्या, परंतु जनतेने त्यांना जागा दाखवली आहे. जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. पण महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महायुती सरकारचे पाप महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. जनतेच्या विश्वासघाताची किंमत महायुतीला विधानसभा निवडणुकीतही घरी बसून जनताच दाखवून देईल, असा विश्वास  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील गांधीभवन येथे आज काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही अशीच भूमिका मांडलेली आहे. आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली तसेच राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समाजातील विविध घटकांशी चर्चा करुन राज्यातील जनतेला अपेक्षित असणारा जाहिरनामा बनवला जाणार आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काही पहिल्यांदाच दिल्लीला गेलेले नाहीत, ते याआधीही गेले होते. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनासह सोनियाजी गांधी यांनाही ते भेटत आहेत, या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. सोनियाजी गांधी देशातील महत्वाच्या व्यक्ती आहेत, पंतप्रधानपद नाकारणाऱ्या त्यागमूर्ती आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली दोनदा काँग्रेस प्रणित युपीए सरकार देशात सत्तेत होते, त्यांना जर उद्धव ठाकरे भेटत असतील तर त्यात गैर काय? जागा वाटपाची जेंव्हा अंतिम बैठक असेल त्यावेळी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा होईल, असे नाना पटोले म्हणाले.

Web Title: "There is no 'little brother, big brother' party in Mahavikas Aghadi", said Nana Patole clearly  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.