शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच; अजित पवारांनी केले ‘हात वर’ म्हणाले, आम्हाला... राज्यातील १३ कोटी जनतेचा विचार करावा लागतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 07:13 IST

No Loan Waiver For Farmers: शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

 मुंबई - शेतकऱ्यांना यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावरून स्पष्ट झाल्याने आता या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. 

महायुतीने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, किती मर्यादेपर्यंत कर्जमाफ करणार हे स्पष्ट केलेले नव्हते. महायुतीच्या नेत्यांनी राज्यभर सभा घेतानाही कर्जमाफीचा शब्द दिला होता. मात्र, आता अजित पवार यांच्या विधानाने लगेच कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मात्र, अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाची रक्कम बँकांमध्ये भरावी. पुढच्या वर्षीही रक्कम भरावी. आधी जे सांगितले होते ते अंमलात येणार नाही. आम्हाला राज्यातील १३ कोटी जनतेचा विचार करावा लागतो. आम्ही या आधीही शेतकऱ्यांना विविध सवलती दिलेल्या आहेत. तसेच, त्यांना मोफत वीजदेखील दिली आहे, असे पवार म्हणाले. 

४०,३६३ कोटी रुपये कर्जवाटप,  उद्दिष्टाच्या केवळ ७५ टक्केच वाटप - जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खासगी आणि ग्रामीण बँक शेतकऱ्यांना पीककर्जाचे आणि मध्यम मुदती कर्जवाटप करतात. २०२४-२५ या आर्थिक वर्षात खरिप हंगामात ५३ हजार ५३० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात ३८ लाख ७० हजार शेतकऱ्यांना ४०,३६३ कोटी इतके कर्जवाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या ७५ टक्के वाटप झाले होते. - याच वर्षातील रब्बी हंगामाचा विचार करता फेब्रुवारी २०२५ पर्यंत  १७ हजार ७४२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. १०.४७ लाख शेतकऱ्यांना हे कर्ज देण्यात आले. २१२५१ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते, ते ८३ टक्के साध्य झाले. मार्चअखेरपर्यंत कर्जवाटप हे २० हजार कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.  - असेही शेतकरी आहेत की, ज्यांनी आधीच्या वर्षांतील पीककर्ज फेडले नाही. नियमानुसार त्यांना नवीन पीकर्कज मिळालेले नाही. शिवाय २०२४-२५ या आर्थिक वर्षात नेमके किती कर्ज शेतकऱ्यांनी आजच्या तारखेपर्यंत फेडलेले आहे याची आकडेवारी आम्ही घेत आहोत, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अजितदादा जे बोलले तीच सरकारची भूमिका आहे. ते योग्यच बोलले आणि तीच सरकारची भूमिका आहे. कर्जमाफी देणेच शक्य नाही वा भविष्यातही ती देता येणार नाही, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

जाहीरनाम्यात जी वचने दिली, ती आम्ही नक्कीच पाळणार आहोत. आमची आश्वासने म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक नसतात. राज्याची आर्थिक परिस्थिती आम्ही मजबूत करू, लोकाभिमुख निर्णय होतीलच. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. 

राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे. महायुतीचे नेते निवडणूक प्रचारात सांगत होते की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, आता ते बदलले. ही कर्जमाफीही एक जुमला होता, हे त्यांनी कबूल करावे. शेतकऱ्यांची सरकारकडून झालेली ही फसवणूक आहे. - विजय वडेट्टीवार,काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते

राज्याची आर्थिक बाजू सांभाळताना त्यांची कसरत होते, पण असे विधान करण्यापूर्वी मित्रपक्षांचा विचार घ्यायला हवा. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. - संजय शिरसाट, मंत्री व शिंदेसेनेचे नेते.

टॅग्स :FarmerशेतकरीAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार