आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी कुठल्याही प्रकारची रस्सीखेच होणार नाही. अशा कुठल्याही व्यवस्थेसाठी कुठल्याही प्रकारची आश्वासने देण्यात आलेली नाहीत. कारण आमच्याकडे आधीपासूनच पुढचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी एक पद्धत आहे. एकनाथ शिंदेंसह आमच्या युतीतील कुठल्याही नेत्याने पदाची मागणी केलेली नाही. सर्वांना विश्वास आहे की, निर्णय निष्पक्षपणे होईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या कामगिरीसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने सुरू केलेल्या जन कल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीसाठी प्रो-इनकंबन्सी बघायला मिळते. मी अत्यंत आत्मविश्वासत दिसत असेल, मात्र महाराष्ट्राच्या विविध भागांत आमच्यासाठी वास्तविक जन समर्थन आहे. याचे श्रेय आम्ही लागू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांना जाते. आमच्या सरकारच्या गत अडीच वर्षात, लोकांनी विकास कामांचे प्रयत्न बघितले आहेत आणि हे सरकार सकारात्मक परिवर्तन आणेन असा विश्वास त्यांना आहे.
महाविकास आघाडीवर 'कटाक्ष' करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमच्या योजनांसंदर्भात बोलताना, या योजनांसाठी पैसे कुठून आणणार? असा प्रश्न त्यांनी केला होता आणि आता आमच्याच योजनांद्वारे मिळणारा लाभ डबल करण्यासंदर्भात बोलत आहेत." एवढेच नाही, तर आम्हाला केंद्राचे समर्थन आहे. ही मोठ-मोठी आश्वासनं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे कुणाचे समर्थन आहे?" असा प्रश्नही यावेळी फडणवीस यांनी केला.
'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "आम्ही विकास आणि आमच्या कल्याणकारी योजनांना निवडणुकीच्या केंद्रस्थानी ठेवू. 'बटेंगे तो कटेंगे' म्हणण्यात काहीही चूक नाही. कारण एक दुभंगलेला समाज विनाशाला सामोरे जातो. ते आज तक वृत्तवाहिनीशी बोलत होते.