सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा प्रश्न ३१ डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. यावर आज दिवाळीनिमित्त राहुल नार्वेकरांनी फटाके फुटायला अजून वेळ आहे, असे संकेत दिले आहेत.
राज्यातील सर्व जनतेला दिवाळी निमित्ताने शुभेच्छा. हा दीपोत्सव सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणेल. सर्वांसोबत सर्वांचा विकास हे भाजपचे ध्येय आहे. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कुलाबा येथे दिवाळी साजरी करण्यात आली, असे नार्वेकर म्हणाले.
यावर आमदार अपात्रच्या सुनावणीवर पत्रकारांनी विचारले असता, राजकीय फटाके नेहमीच फुटत असतात. फटाके फुटायला अजून वेळ आहे. काळजी करू नका, असे नार्वेकर म्हणाले.
लोकशाहीत जनसामान्याला संविधानिक निर्णय होण अपेक्षित असते. तसाच निर्णय घेणे गरजेचे आहे आणि सरकार तसा निर्णय घेईल. लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर असतात. राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय घेणे गरजेचे आहे. संविधानात ज्या तरतुदी आहेत, त्याच पालन करून कायद्यानुसार निर्णय आपण घेऊ, असे संकेत नार्वेकर यांनी दिले.