शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

‘एपीएमसी’वर बंदचा परिणाम नाही

By admin | Published: June 06, 2017 5:47 AM

शेतकऱ्यांनी राज्यभर घोषित केलेल्या बंदचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर काहीही परिणाम झालेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांनी राज्यभर घोषित केलेल्या बंदचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर काहीही परिणाम झालेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून ५००पेक्षा जास्त ट्रक-टेम्पोमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. होलसेल मार्केटमध्ये भाज्यांचे भाव घसरण्यास सुरुवात झाली असून, किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडणे सुरूच आहे. शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केल्यानंतरही नवी मुंबई, पनवेल परिसरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मुंबई बाजार समितीमधील आवकही पूर्ववत झाली आहे. १ जूनपासून राज्यातील भाजीपाला विक्रीसाठी येत नव्हता. पूर्णपणे परराज्यातील मालावर अवलंबून राहावे लागत होते; परंतु सोमवारी सातारा, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगरमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. आवक पूर्ववत झाल्यामुळे होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. >किरकोळ बाजारात पूर्वीचाच दरशनिवारी १६ ते २४ रुपये किलो दराने विकला जाणारा कोबी ८ ते १२ रुपयांवर आला आहे. टोमॅटो ३६ ते ४० वरून १८ ते २२ व फ्लॉवर २४ ते ३० वरून १० ते १६ रुपये किलो दराने विकला गेला आहे.एपीएमसीमध्ये बाजारभाव कमी झाले असले, तरी किरकोळ बाजारामध्ये मात्र पूर्वीच्याच दराने भाजीपाला विकला जात होता. ८० ते १२० रुपये किलो दराने भाजीपाला विकला जात आहे. ६ जूनलाही आवक वाढली तर बाजारभाव कमी होतील.>देशभरातून विक्रीस आलेल्या कृषी मालाचा तपशील वस्तूराज्य ट्रक-टेम्पोलिंबूआंध्र प्रदेश, कर्नाटक०४आलेसातारा०४अरबीमध्य प्रदेश०२भेंडीगुजरात, महाराष्ट्र३१फरसबीदिल्ली, महाबळेश्वर०३फ्लॉवरकोल्हापूर, नगर, पुणे२५गाजरमध्य प्रदेश, महाराष्ट्र१५काकडीजुन्नर, ओतूर३२कारली गुजरात०५कोबीकर्नाटक, दिल्ली२९शेवगा शेंगतामिळनाडू०६सुरणआंध्र प्रदेश०३टोमॅटोगुजरात, महाराष्ट्र६२वाटाणादिल्ली०९मिर्चीउत्तर प्रदेश२०>वस्तू४ जून५ जूनकिरकोळकारली१४ ते २४ २८ ते ३२८०कोबी१६ ते २४८ ते १२८०ढोबळी ४० ते ५०३० ते ३६८०मिर्चीफ्लॉवर२४ ते ३०१० ते १६८० ते १२०फरसबी२० ते ५०३६ ते ५०१०० ते १६०भेंडी३० ते ३४३० ते ३४८०शेवगा२८ ते ३६३० ते ३४८० ते १००टोमॅटो३६ ते ४०१८ ते २२८० ते १२०